साहित्य

गौतम बुद्धाचा जीवन परिचय | Gautam Buddhacha Jivan Parichay

गौतम बुद्धांचा जीवन परिचय | गौतम बुद्ध यांचा उपदेश | गौतम बुद्ध विचार | गौतम बुद्ध कथा मराठी | गौतम बुद्धांचे शिक्षण | गौतम बुद्धांचा जन्म | गौतम बुद्धाचा जीवन परिचय मराठी

गौतम बुद्धाचा जीवन परिचय | Gautam Buddhacha Jivan Parichay आपण बघणार आहोत 

गौतम बुद्धांचा जीवन परिचय | Gautam Budhaacha Jivan Parichay
गौतम बुद्धाचा जीवन परिचय | Gautam Buddhacha Jivan Parichay

Photo Credit : Yash Mishra

गौतम बुद्धांचा जीवन परिचय | Gautam Budhaacha Jivan Parichay : नमस्कार मित्रांनो आज आपण गौतम बुद्धांचा जीवन परिचय | Gautam Budhaacha Jivan Parichay या विषयाची महिती घेणार आहोत. गौतम बुद्धांचा जीवन परिचय | Gautam Budhaacha Jivan Parichay चा अभ्यास करतांना आपण तो खूप बारकाईने केला पाहिजे.

कारण बुद्ध हे शांतीच प्रतीक आहे. कमी शब्दात बुद्ध परिचय देणे कठीण आहे. गौतम बुद्धांचा जीवन परिचय सांगताना त्यांच्या जीवनातील प्रत्येक घटनेची विस्तृत माहिती आपल्याला या लेखात वाचायला मिळणार आहे. आम्ही हळूहळू या लेखात खाली दिलेल्या मुद्यांना धरून विस्तृत माहिती अपडेट करणार आहोत.

गौतम बुद्धांचा जीवन परिचय चा अभ्यास करतांना सर्वप्रथम आपण बुद्ध म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे.

बुद्ध म्हणजे काय ?

गौतम बुद्धांचा जीवन परिचय आपण बघणार आहोत यासाठी आपल्याला  बुद्ध म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला बोधिसत्व म्हणजे काय ? हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

बोधिसत्व म्हणजे बुद्धत्व प्राप्तीसाठी ज्या अवस्था आवश्यक असतात. त्या बोधीसत्वा मध्ये असतात. बोधिसत्व सतत दहा जन्मांपर्यंत बोधिसत्व राहिल्यानंतर तो बुद्ध होतो.

बोधिसत्व खालील अवस्था पूर्ण पूर्ण केल्यानंतर बुद्ध होतो.

  • पहिल्या जन्म “मुदिता” (आनंद)
  • दुसरा जन्म “विमलता” (पावित्र्य)
  • तिसरा जन्म “प्रभाकारी” (तेजस्विता)
  • चौथा जन्म “अर्चीश्मती” (प्रखर बुद्धीमत्ता)
  • पाचवा जन्म “सुदुर्जय”
  • सहावा जन्म “अभिमुखी”
  • सातवा जन्म “दुन्गमा”
  • आठवा जन्म “अचल”
  • नववा जन्म ” साधुमती”
  • दहावा जन्म “धम्ममेधा”

वरील दहा अवस्थांमधून गेल्यानंतर बोधीसत्वाला बुद्धत्व प्राप्त होते. यावरून आपल्याला समजले असेलच कि, बुद्ध हा शब्द जितका छोटा तितकाच त्याचा अर्थ खूप मोठा आणि बुद्ध होण्यापर्यंतचा प्रवास हा एका जन्माचा नाही. 

गौतम बुद्धांचा जीवन परिचय :

  • ५६३ इ.स.पूर्व     वैशाखी पौर्णिमा, जन्म लुंबिनी वनात (नेपाळ)
  • ५६३ इ.स.पूर्व     असितमुनी व भाचा नरदत्ताचे आगमन आणि भविष्य कथन सात दिवसानंतर माता महामायेचा मृत्यू
  • ५६३ इ.स.पूर्व      विद्याभ्यासास सुरुवात
  • ५५५ इ.स.पूर्व     सिद्धार्थाचा यशोधरेशी विवाह
  • ५४७ इ.स.पूर्व     सिद्धार्थाचा शाक्यसंघात प्रवेश
  • ५४३ इ.स.पूर्व      शाक्य संघाशी संघर्ष, ‘रोहिणी’ नदीवरून कोलियांशी वाद
  • ५३५ इ.स. पूर्व    पुत्र राहुलचा जन्म
  • ५३४ इ.स. पूर्व    गृहत्याग व परिव्रज्या
  • ५३४ इ.स. पूर्व    वैशाखी पौर्णिमा बुद्धप्राप्ती, निरंजना नदीकाठी (बुद्धगया) धम्मचक्र प्रवर्तन (सारनाथ) पाच परिव्राजकांची धम्मदीक्षा कौंडिण्य, अश्वजित, कश्यप, महानाम, भद्रिक
  • ५२८ इ.स. पूर्व     त्याच दिवशी यश यांची धम्मदीक्षा
  • ५२८ इ.स. पूर्व     दुसऱ्या दिवशी, यशाच्या मित्रांची व उरुवेला काश्यप व पाचशे शिष्य; निरंजना कश्यप व दोनशे शिष्य, गया काश्यप व तीनशे शिष्य यांची धम्मदीक्षा
  • ५२७ इ.स. पूर्व     सारीपुत्त व मोग्गलान आणि अडीचशे परिव्राजकांची धम्मदीक्षा राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा
  • ५२७  इ.स. पूर्व  राजा बिम्बिसाराची धम्मदीक्षा
  • ५२७ इ.स. पूर्व    दशसहस्त्र ब्राह्मणांची धम्मदीक्षा
  • ५२७ इ.स. पूर्व     सुदत्त (अनाथपिंडकाची) धम्मदीक्षा
  • ५२७ इ. स. पूर्व    राजा प्रसेनजिताची धम्मदीक्षा
  • ५२७ इ.स. पूर्व     जीवक (वैद्यक) ह्याची धम्मदीक्षा
  • ५२७ इ.स. पूर्व     रठ्ठपालाची धम्मदीक्षा
  • ५२७ इ.स. पूर्व     घरचे निमंत्रण, पिता शुद्धोदनाची शेवटची भेट
  • ५२७  इ.स. पूर्व    पुत्र राहुल याचा भिक्खू संघात प्रवेश
  • ५२५ इ.स. पूर्व      राजगृह येथे वर्षावास
  • ५२४ इ.स. पूर्व     वैशाली येथे वर्षावास
  • ५२३  इ.स. पूर्व     संकुल पर्वत (त्रयस्त्रिस) येथे आगमन
  • ५२१ इ.स. पूर्व      सुसुमारगिरी (चुनार) येथे आगमन
  • ५२० इ.स. पूर्व      कौशाम्बी (अलाहाबाद) येथे आगमन
  • ५१९ इ.स. पूर्व      परिलेयक (मिर्जापूर) येथे आगमन
  • ५१८ इ.स. पूर्व      नाला (बिहार) येथे आगमन
  • ५१७ इ.स. पूर्व     वैरंजा (कनोज आणि मथुरा यांच्याकडे) येथे आगमन
  • ५१६ इ.स. पूर्व      चालिय पर्वत (बिहार) येथे आगमन
  • ५१५ इ.स. पूर्व      श्रावस्ती (बलरामपुर उत्तरप्रदेश) येथे आगमन
  • ५१४ इ.स. पूर्व     कपिलवस्तु येथे आगमन
  • ५१३  इ.स. पूर्व     अप्पलबी (कानपूर व उन्नव यामध्ये) आगमन
  • ५१२ इ.स. पूर्व      राजगृह (जि. नालंदा, बिहार) येथे आगमन
  • ५११ इ.स. पूर्व      चालिय पर्वत येथे आगमन
  • ५०९ इ.स. पूर्व      राजगृह येथे आगमन
  • ५०८ ते ४८४ इ.स. पूर्व  २२ वर्षे श्रावस्ती येथे आगमन (अनाथपिंडकाचे जेतवन)
  • ४८३ इ.स. पूर्व      वैशाली येथे आगमन
  • ४८३ इ.स. पूर्व      माता गौतमी व पत्नी यशोधरेची भेट
  • ४८३ इ.स. पूर्व      वैशाखी पौर्णिमा तथागताचे महापरिनिर्वाण (कुशिनारा) रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात.
Advertisement

One Comment

  1. खूप चांगली माहिती आहे.
    नमो बुध्दाय 🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button