अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) मराठी 2023 | Atal Bandhkam Kamgar Awas Yojana (Rural) Marathi 2023
Maharashtra Atal Construction Workers Awas Yojana | Atal Bandhkam Awas Yojana 2023 | अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2023 | Online Form PDF | Atal Aawas Yojana | अटल बांधकाम योजना | Sarkari Yojana |

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) २०२३
भारत हा विकसनशील देश आहे. आपल्या भारतातील जास्तीत जास्त लोक हे शेती करतात. त्यामुळे गावाकडे राहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या ही भारताची समस्या ठरतच आहे. त्यामुळे वस्त्या दाट होत आहेत. खेड्यांतही हीच परिस्थिती आपल्याला अनुभवायला मिळेल.
अशा परिस्थितीत हवामान बदल आणि पर्यावरण अससमतोल या कारणामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. म्हणून शेतकरी काही प्रमाणात व्यवसाय आणि रोजंदारी याकडे वाढला आहे. शहरी भागात असो की ग्रामीण भाग आपल्या भारतात लोकसंख्या अनियंत्रित असल्याकारणाने राहण्यासाठी घरांची कमतरता आता भासू लागली आहे.
महागाई आणि इतर कारणांमुळे असंघटित कामगारांचे राहण्याच्या घराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. असंघटित कामगार हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे. तसेच या असंघटित कामगारांमध्ये सर्वाधिक संख्या ही बांधकाम कामगारांची आहे.
इतरांची स्वप्नातले घर बांधून देणाऱ्या या असंघटित आर्थिक दृष्ट्या दुर्बल कामगारांची स्वप्नातील घर व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने याकडे लक्ष दिले आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजना सुरू केली.
बांधकाम कामगारांच्या या समस्येकडे लक्ष देऊन महाराष्ट्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजना राबविण्यास सुरुवात केली.
यामुळे शहरी भागातील कामगारांचा राहण्याचा प्रश्न सुटला. मात्र ग्रामीण भागातील कामगारांचा या योजनेत समावेश नव्हता.
जून 2015 मध्ये केंद्र शासनाने एक धोरण जाहीर केले.या धोरणानुसार “देशातील प्रत्येक कुटुंबाला राहण्यासाठी आपले स्वतःचे घर असावे” असे मांडण्यात आले.
आणि याच धोरणाला अनुसरून भारतात प्रधानमंत्री आवास योजने योजना सुरू केली. याच योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून महाराष्ट्र शासनाने शासनाकडे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नोंदणी असलेल्या ग्रामीण भागातील कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना सुरू केली.
आज आपण या लेखात “अटल बांधकाम कामगार आवास योजना” याची सविस्तर माहिती घेणार आहोत. यात आपण कामगारांची नोंदणी त्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय सवलती, आर्थिक मदत, अर्ज करण्याची पद्धत, ही सर्व माहिती पाहणार आहोत.
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) २०२३ सविस्तर माहिती
महाराष्ट्र शासन आपल्या नागरिकांच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्न करीत असते. याचाच भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असलेल्या बांधकाम कामगाराच्या निवासाची व्यवस्था व्हावी या दृष्टीने अटल बांधकाम कामगार आवास योजनेची सुरुवात केली.
या योजनेत ग्रामीण आणि शहरी असे विभाग करण्यात आले. शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या 30 ऑक्टोबर 2018 च्या बैठकीत ग्रामीण भागातील नोंदणीकृत म्हणजेच सक्रिय असणाऱ्या बांधकाम कामगारांना त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर घरकुल बांधण्यासाठी किंवा त्यांचे सध्याचे अस्तित्वात असलेले कच्चे घर पक्क्या स्वरूपात बांधण्यासाठी या कामगारांना आर्थिक सहाय्यता देण्यास मंजुरी देण्यात आली.
बांधकाम कामगार हे असंघटित स्वरूपाच्या कामगार वर्गामध्ये मोडले जातात. तसेच बांधकाम क्षेत्र हे रोजगार मिळण्याचे मोठे क्षेत्र मानले जाते. तसेच आपल्या राज्यातील खेड्यांमधील नागरिक शहरात येऊन यात काम करीत असतात. त्यामुळे इतर असंघटित कामगारांच्या संख्येपेक्षा बांधकाम कामगार यांची संख्या जास्त आहे.
तसेच त्यांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न सुद्धा मोठा आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने अटल बांधकाम कामगार निवास योजनेची सुरुवात केली जेणेकरून या कामगारांना मूलभूत सुविधायुक्त घरकुले मिळतील आणि त्यांची प्रगती होईल.
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) २०२३ योजनेची वैशिष्ट्ये
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडे नोंदणी केलेली असलेल्या ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांसाठी ही योजना
- अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) २०२३ योजनेत ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना त्यांच्या स्वतःच्या घरासाठी आर्थिक सहाय्य महाराष्ट्र शासनाचा कडून केले जाईल.
- यात घर बांधणीसाठी लागणारी जागा ही बांधकाम कामगाराची स्वतःची असावी लागते.
- जर कच्च्या स्वरूपात घर असेल तर पक्क्या स्वरूपात बांधण्यासाठी ही राज्य शासनाकडून सहकार्य केले.
- अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) २०२३ योजना महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबवली जाते.
- या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्फत एकूण एक लाख पन्नास हजार रुपये प्रत्येकी लाभार्थ्याला आपले स्वतःचे घर बांधण्यासाठी मिळतात.बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेऊन घरकुल बांधकाम पूर्ण झाल्यावर बांधकामाच्या पूर्णत्वाचा दाखला सादर करावा लागतो.
- दाखला सादर केल्यानंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून सदर लाभार्थी आर्थिक सहाय्य मिळण्यास पात्र होतो.
- महाराष्ट्र शासनाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात जवळपास 12 लाख 25 हजार 753 बांधकाम कामगारांची संख्या आहे.
- या योजनेअंतर्गत लाभार्थी असणाऱ्या बांधकाम कामगाराला २६९चौ.फुट चटई क्षेत्र असलेले घर बांधकाम करणे आवश्यक आहे.
- इतक्या जागेवर बांधकामा करिता रुपये एक लाख पन्नास हजार इतके अनुदान लाभार्थी बांधकाम कामगाराला शासनासतर्फे देण्यात येते.याव्यतिरिक्त जास्त बांधकाम करावयाचे असल्यास लाभार्थ्याला स्वखर्च करण्याची मुभा आहे.
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) २०२३ योजनेची पात्रता
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे अटल योजनेसाठी काही पात्रता आहेत त्या खालील प्रमाणे
- अटल बांधकाम आवास योजनेचा लाभ घेताना बांधकाम कामगाराची नोंद “महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ” यांच्याकडे असावी.
- नोंदीत बांधकाम कामगाराचे स्वतःचे /पतीचे/ पत्नीच्या नावावर महाराष्ट्र राज्यात पक्के म्हणजेच सिमेंट, विटा, वाळूने बांधलेले घर नसावे.अशा आशयाचे स्वयंघोषणापत्र शपथपत्र सादर करणे आवश्यक राहील.
- नोंदीत बांधकाम कामगाराला स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी स्वतःच्या/ पती /पत्नीच्या नावे मालकीची जागा असावी. अथवा स्वतःच्या मालकीचे कच्चे घर असलेल्या जागेतही घर बांधता येईल.
- नोंदीत बांधकाम कामगाराने याअगोदर शासनाच्या कोणत्याच गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच मंडळाकडील देय, गृहकर्जावरील व्याज परतावा करिता अनुज्ञेय अर्थसाह्यचा अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. याबाबतचे स्वयंघोषणापत्र /शपथ पत्र सादर करणे आवश्यक राहील.
- अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ हा प्रती कुटुंबासाठी आहे.
- एकदा लाभ घेतल्यानंतर बांधकाम कामगार या योजनेचा पुनश्च लाभास पात्र राहणार नाही.
- नोंदणीकृत बांधकाम कामगार हा प्रधानमंत्री आवास योजनेच्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी मध्ये समाविष्ट नसावा.
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) २०२३ योजना अर्ज PDF.
बांधकाम कामगार कामगार नोंदणी अर्ज
बांधकाम कंत्राटदाराचे /ठेकेदाराचे/ विकासकाचे बांधकाम कामगारास मागील वर्षात 90 दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्राचा नमुना
आधार मधील माहितीच्या वापरा संबंधात संमती पत्र
स्वयंघोषणापत्र
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) २०२३ शासन निर्णय
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) २०२३ योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीत बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील नोंदीत बांधकाम कामगारांसाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे आणि विहित अर्ज देणे आवश्यक आहे.
- सक्षम अधिकाऱ्याने नोंदणीत बांधकाम कामगार म्हणून दिलेल्या ओळखपत्राची प्रत
- आधार कार्ड
- सातबाराचा उतारा /मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र /ग्रामपंचायत मधील मालमत्ता नोंदवहीततील उतारा.
- लाभधारकांनी स्वतःच्या नावे सुरु असलेल्या बचत खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत.
वरी सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यावर सदर अर्जासहित बांधकाम कामगार हा अटल बांधकाम कामगार आवास योजनेच्या अर्ज सादर अर्ज सादर करू शकतो
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) २०२३ योजनेतील घराची रचना
स्वतःचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते बांधकाम कामगारांचे हेच स्वप्न महाराष्ट्र शासनाच्या अटल बांधकाम कामगार आवास योजनेमार्फत पूर्ण करण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन बांधकाम बांधकाम कामगारांना जे घर बांधून देणार आहे त्या घराचे स्वरूप पुढीलप्रमाणे.
- संपूर्ण घर बांधकाम हे विटा, वाळू व सिमेंटचे असणे आवश्यक.
- घरकुलामध्ये एक स्वयंपाक घर आणि एक बैठक हॉल यांचा समावेश असेल.
- शौचालय व स्घनानगृह बांधणे आवश्यक.
- जोथ्यापासून घराची उंची कमीत कमी दहा फूट असावी.
- छतासाठी स्थानिक भौगोलिक वातावरणानुसार मजबूत लोखंडी किंवा सिमेंट पत्रे अथवा कौलांचा वापर करण्यास मुभा राहील.
- घराच्या दर्शनी भागावर मंडळाचे बोधचिन्ह म्हणजेच लोगो लावणे आवश्यक आहे.
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) २०२३ योजनेतील लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया
अटल बांधकाम कामगार आवास योजना राबवण्यासाठी अप्पर कामगार आयुक्त /कामगार उपयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
यात प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हे सदस्य. जिल्हा कार्यकारी अधिकारी (महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ) द्वितीय सदस्य तसेच उपजिल्हा कार्यकारी अधिकारी म(महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ) हे सदस्य सचिव आहेत.ही समिती असून समिती समितीचे अर्ज छाननी कारभार अर्थसाह्य देण्याची कार्यपद्धती पद्धती खालील प्रमाणे
- अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना सर्वप्रथम जिल्हा कार्यकारी अधिकारी / उपजिल्हा कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज करावा.
- बांधकाम कामगाराकडून प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून अर्जदाराची पात्रता तसेच अर्जदार सोबत सादर केलेला कागदपत्राची जिल्हास्तरीय लाभार्थी निवड समिती तपासणी करेल व त्यात झालेल्या बांधकाम कामगाराची अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून निवड करेल.
- उपजिल्हा कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तथा सदस्य सचिव सनियंत्रण समिती हे सनियंत्रण समितीच्या छाननीत पात्र झालेल्या आणि मंजुरी दिलेल्या बांधकाम कामगारांची तालुकानिहाय यादी तयार करतील. सदर यादी सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांना सादर करतील. आणि त्याची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तथा अध्यक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना उपलब्ध करून देतील.
- सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे ग्रामविकास विभाग यांच्या अधिपत्याखाली संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण विभाग नवी मुंबई यांचे कडे पात्र बांधकाम कामगार यांचे घरकुल बांधकामापोटी निधी वर्ग करतील.
- घराच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार संचालक राज्य व्यवस्थापन कक्षाकडून टप्प्याटप्प्याने ठरवून दिलेल्या बांधकाम पूर्ण झाल्याची खात्री झाल्यावर सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली द्वारे बांधकाम कामगारांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येईल.
- योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून चार टक्के एवढी रक्कम राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयास प्रशासकीय खर्चासाठी देय्य राहील.
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) २०२३ योजनेतील Online Form | Online Registration
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) २०२३ योजनेतील Online Form | Online Registration करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या वेबसाईटवर प्रथम भेट द्यावी लागणार आहे.
भेट दिल्यानंतर आपल्याला खालील छायाचित्रात लाल रंगाच्या चौकोन दाखविला आहे. त्यात बांधकाम कांग्र नोंदणी यावर क्लिक करून केल्यानंतर दुसऱ्या छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे माहिती टाकून आपला फॉर्म भरून घ्यावा लागणार आहे. अश्याप्रकारे आपले Online Registration पूर्ण करावे


टीप : “आपल्या योजना” या पोर्टलच्या माध्यमातून आपण सतत आपल्या वाचकांना माहिती देत असतो. महाराष्ट्र शासन आपल्या नागरिकांच्या प्रगतीसाठी योजनांमध्ये वेळोवेळी गरजेनुसार सुधारणा करीत असते.यासाठी आपण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी ही विनंती.
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) २०२३ प्रश्नोत्तरे | FAQ’S
Q.1. अटल कामगार योजना म्हणजे काय ?
Ans : आपल्या राज्यातील बांधकाम कामगारांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने “आतल्बंध्काम कामगार आवास योजना” सुरु केली.
Q.2. अटल कामगार योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
Ans : अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीत बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील नोंदीत बांधकाम कामगारांसाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे आणि विहित अर्ज देणे आवश्यक आहे.
- सक्षम अधिकाऱ्याने नोंदणीत बांधकाम कामगार म्हणून दिलेल्या ओळखपत्राची प्रत
- आधार कार्ड
- सातबाराचा उतारा /मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र /ग्रामपंचायत मधील मालमत्ता नोंदवहीततील उतारा.
- लाभधारकांनी स्वतःच्या नावे सुरु असलेल्या बचत खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत.
Q.3. अटल कामगार योजने अंतर्गत किती अनुदान मिळते ?
Ans : या योजनेअंतर्गत लाभार्थी असणाऱ्या बांधकाम कामगाराला २६९चौ.फुट चटई क्षेत्र असलेले घर बांधकाम करणे आवश्यक आहे.इतक्या जागेवर बांधकामा करिता रुपये एक लाख पन्नास हजार इतके अनुदान लाभार्थी बांधकाम कामगाराला शासनासतर्फे देण्यात येते.याव्यतिरिक्त जास्त बांधकाम करावयाचे असल्यास लाभार्थ्याला स्वखर्च करण्याची मुभा आहे.
Q.4. अटल कामगार योजनेसाठी पात्रता काय आहे ?
Ans :अटल बांधकाम आवास योजनेचा लाभ घेताना बांधकाम कामगाराची नोंद “महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ” यांच्याकडे असावी.नोंदीत बांधकाम कामगाराचे स्वतःचे /पतीचे/ पत्नीच्या नावावर महाराष्ट्र राज्यात पक्के म्हणजेच सिमेंट, विटा, वाळूने बांधलेले घर नसावे.अशा आशयाचे स्वयंघोषणापत्र शपथपत्र सादर करणे आवश्यक राहील.
Q.5. बांधकाम नोंदणी कुठे करावी ?
Ans :अटल बांधकाम आवास योजनेचा लाभ घेताना बांधकाम कामगाराची नोंद “महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ” यांच्याकडे करावी .सदर नोंदणी प्रक्रिया ही अधिकृत वेबसाईट वर आहे .
Q.6. बांधकाम कामगार यादी ?
Ans : “महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ” यांच्याकडे करावी .सदर नोंदणी प्रक्रिया ही अधिकृत वेबसाईट वर आहे . यात आपल्याला बांधकाम कामगारांची यादी मिळेल .
तात्पर्य
मित्रांनो आज आपण वरील लेखात “अटल बांधकाम आवास योजनेची” सविस्तर माहिती पहिली सदर माहिती आपल्याला आवडल्यास नक्की शेअर करा . वाटला याबल नक्की कमेंट करा आणि आपण आम्हाला मेल करूनही कळवू शकता.
धन्यवाद.. ! जय महाराष्ट्र ..!