वेबस्टोरीज

रक्तदात्यांची माहिती | Blood Donor Database

“भारतातील रक्तदात्यांची महिती” | Blood Donation

नमस्कार मित्रांनो आपण “आपल्या योजना” या पोर्टलवर वाचकांसाठी सतत माहितीपूर्ण लेख लिहिण्याचा प्रयत्न करीत असतो. आज आपण रक्तदान (a blood donation) आणि रक्तदाता (a blood donors) याबद्दल माहिती घेणार आहोत.

आपले नातेवाईक किंवा मित्रपरिवारातील व्यक्ती दवाखान्यात असतांना त्यांना रक्ताची गरज भासली असेलच. असे बऱ्याच वेळा होते कि,  तुम्ही Blood Bank  मध्ये गेल्यावर पाहिजे त्या ग्रुपचे रक्त तुम्हाला  त्यावेळेत उपलब्ध होत नाही. मग अशा वेळेस आपल्याला खूप अडचणी येतात याच अडचणींवर मात करण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा आणि  माहिती आपल्या परिवारातील प्रत्येकासोबत शेअर करा.रक्तदानाचे (about blood donate) महत्व आपल्याला माहितीच आहे. आपल्या भारतात  रक्तदात्यांचे विवध समूह ( blood donating groups), Whatsapp group ही आहेत. समाजात असेही काही आदरणीय व्यक्ती आहेत जे आपल्या प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान (voluntary blood don) करीत असतात, ते फक्त रक्तदाते नसतात तर ते प्राणदाते सुद्धा असतात. रक्तदानाचे अर्धशतक केलेले लोकही आहेत, असे व्यक्ती समाजासाठी आदरणीय आणि प्रेरणादायी आहेत.

यासाठी आपणही रक्तदान केलेच पाहिजे. तंत्रज्ञानाच्या युगात आता आपल्याला सर्व माहिती AI (Chat GPT ), गुगल, whatsap, सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत लगेच पोहोचते. आज वर्तमानपत्रेही ऑनलाईन आपल्याला वाचायला मिळतात. तंत्रज्ञान विकसित होतंय आणि मनुष्य याचा पुरेपूर वापर करीत आहे. सुरवातीच्या काळात कुणाला रक्ताची गरज लागली तर, ब्लड बँक, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या आपण संपर्क करून आपली गरज आपण भागवत होतो. जर यातही कुणी मिळाला नाही तर, राक्तदात्याचा  (find a blood donor) आपला  शोध हा असाच सुरु राहत होता. हे सर्व आपल्यासाठी  voluntary blood donor चे काम करीत असतात.

आज आपल्याला या लेखाच्या मध्यमातून अशा विशिष्ट ३ पोर्टल ची माहिती देणार आहे ज्यात सर्व रक्तदात्यांची (Blood Donor Database) माहिती आपल्याला मिळणार आहे. तसेच आपल्याला गरज असलेल्या राक्तगटाच्या रक्तदात्याला आपण संपर्क करून त्याला रक्तदानासाठी विनंती करू शकणार आहे. चला तर ही माहिती जाणून घेऊया.

friends2support: हे आपले पहिले पोर्टल आहे,  या पोर्टलची निर्मिती  Shareef. Sk,Naveen. E, K.eswar, S Phani,Murali Krishna. M   आपल या चार इंजिनियर्सनी मिळून १४ नोव्हेंबर २००५  साली केली. २००५ यांनी Blood Donor Database म्हणजेच आपल्या भाषेत रक्तदात्यांची ऑनलाईन डिरेक्टरी सुरु केली. यांच्या सोबत त्यांची जवळपास १०० लोकंची टीम भारत, नेपाळ, येमेन, बांगलादेश, श्रीलंका, ओमान आणि मलेशिया या सात देशांमध्ये काम करत आहे. जवळपास ४ लाख सदस्य म्हणजेच रक्तदात्यांची डिरेक्टरी आपल्याला या पोर्टलवर  मिळेल.  डिरेक्टरी मध्ये आपल्याला भारतातील कोणत्याही शहरातील voluntary blood donor चा संपर्क मिळू शकणार आहे.  Google वर friends2support Donors असं टाईप केल्यानंतर, तुम्हाला

असे वेबपेज दिसेल. खाली फोटोत दिलेल्या प्रमाणे आपल्याला गरज असलेला ब्लडग्रुप निवडायचा आहे, त्यानंतर देश, राज्य, जिल्हा आणि सगळ्यात शेवटी शहराची निवड केल्यानंतर आपण निवड केलेल्या शहरातील आणि  friends2support आणि  या पोर्टल वर रजिस्टर केलेल्या सर्व रक्तदात्यांचा Blood Donation Database आपल्या समोर येईल. यात आपल्याला त्यांचा संपर्क क्रमांक मिळेल जेणेकरून आपण त्यांना संपर्क करून रक्तदानासाठी विनंती करू शकता. अशाप्रकारे आपण या पोर्टलवरून माहिती घेऊन गरजू व्यक्तींची रक्ताची गरज पूर्ण करू शकतो, आणि आपल्या  प्रगतीशील  भारतात Donate in India ही मोहीम राबवू शकतो.या पोर्टल वर आपले नाव आणि नंबर रजिस्टर करून आपणही एखाद्याची रक्ताची गरज भावू शकतो. रजिस्टर करा आणि माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button