व्यवसाय

ग्राफिक डिझाईन | Graphic Design

ग्राफिक डिझाईन म्हणजे काय? | ग्राफिक्स डिझाईन कोर्स | Graphics Designer Software | ग्राफिक डिझायनर कसे बनावे ? |

ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ?
ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ?

Table of Contents

ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ? | What Is Graphics Design 

ग्राफिक डिझाईनिंग व्यवसाय बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. तसेच या लेखात आपण ग्राफिक डिझाईनिंग या व्यवसायातील संधी आणि अडचणी याबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्हाला माहितीच आहे, दैनंदिन जीवनात आपण प्रगती करत असतांना,आपल्या सभोवतालच्या परिस्थिती बदलत आहे.

आपण दैनंदिन जीवनात जी, साधने वापरत आहोत, त्यात सुद्धा बदल होत आहे. ग्राफिक डिझाईनिंग याबद्दल माहिती घेताना ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ? | What Is Graphics Design?  हे आपण समजून घेणार आहोत.

एखादी माहिती किंवा एखादा संदेश हा  विशिष्ट व्यक्तीपर्यंत ,ग्राहकांपर्यंत किंवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करतो, मग ही माध्यमे कोणतीही असू शकतात.

या माध्यमांचा उपयोग करून आपण एखादी माहिती चित्र,शब्द,एकत्र विशिष्ट प्रकारची रचना आणि रंगसंगती वापरून एकत्रितपणे चित्राच्या स्वरूपात तयार करतो. हे सर्व तयार करण्याच्या प्रक्रीयेलाच ग्राफिक डिझाईन असे म्हटले जाते. 

ग्राफिक डिझाईन यालाच कम्युनिकेशन डिझाईन असे सुद्धा म्हटले जाते. कारण असे की, आपण जाहिरातीच्या जगात जगत आहोत, एखादी माहिती किंवा एखाद्या ब्रँडची माहिती ही इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्राफिक डिझाईनिंग चा खूप मोलाचा वाटा आहे.

ग्राफिक डिझायनिंग म्हणजेच कम्युनिकेशन डिझाईन असे का ?

 

 

ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ?
ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ?

Graphics Designer | Communication Design कम्युनिकेशन म्हणजे संवाद.ग्राफिक डिझाईन करताना आपण एक चित्र स्वरूपातून इतरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असतो.हा संवाद चित्रस्वरूपी असतो. म्हणून यालाच कम्युनिकेशन डिझाईन असे सुद्धा म्हटले जाते.

कम्युनिकेशन डिझाईन च्या माध्यमातून आपण आपले विचार आपल्या प्रॉडक्ट ची माहिती किंवा इतर काही माहिती ही चित्र स्वरूपाने आपल्या लक्ष ग्राहकापर्यंत पोहोचवू शकतो आणि त्याच्याशी संवाद साधू शकतो.

Creative Graphics Designer  ने तयार केलेल्या पोस्टर किंवा इतर काही साधनांच्या माध्यमातून  माहिती गरजू किंवा त्यालाच मार्केटिंग च्या भाषेत लक्ष ग्राहक असे म्हणजेच टार्गेट ऑडियन्स असे म्हटले जाते. एकतर्फी संवाद असतो.

ग्राफिक डिझायनिंगचे ८ प्रकार  | 8 Types Of Graphics Design

ग्राफिक डिझाईन | Graphic Design
ग्राफिक डिझाईन | Graphic Design

Creative Graphics Designer  हे काम करीत असतांना हे क्षेत्र फार विस्तारलेले आहे, कारण आतापर्यंत आपण फक्त Graphics Designer हाच शब्द किंवा हीच जॉब प्रोफाईल तुमच्या कानावर आली असेल.

क्षेत्र फार विस्तारले असल्याकारणाने कामाच्या पद्धतीवरून किंवा तुम्ही ज्या जाहिरात माध्यमासाठी काम करीत असणार त्यावरून कोणत्या क्षेत्रातील Graphics Designer आहात याची लगेच माहिती होते. त्यावरूनच आज आपण Graphics Designer चे ८ प्रकार पाहणार आहोत.

  • विज्युअल आयडेंटिटी ग्राफिक डिझाईन

  • मार्केटिंग आणि ग्राफिक डिझायनर डिझाईनर

  • युजर इंटरफेस ग्राफिक डिझाईन

  • पब्लिकेशन ग्राफिक डिझाईन

  • पॅकेजिंग ग्राफिक डिझायनर

  • मोशन ग्राफिक डिझायनर

  • इन्व्हरमेंटल ग्राफिक डिझाईन

  • आर्ट आणि इलस्ट्रेशन  ग्राफिक डिझाईन

 

विज्युअल आयडेंटिटी ग्राफिक डिझाईन | Visual Identity Graphics Design

Graphic Design Mhanje kay ?
Graphic Design Mhanje kay ?

आपण जाहिरातीच्या जगात आहोत. प्रत्येक उद्योजकाचे एक स्वप्न असते की, आपल्या सर्व लक्ष ग्राहकांच्या मनात आपल्या प्रोडक्ट्स ने  घर केले पाहिजे. यावर आधारित सर्व गोष्टी ह्या विज्युअल आयडेंटिटी ग्राफिक डिझायनर करीत असतो.

उद्योग करताना आपण सर्वप्रथम उद्योजक आपल्या  उद्योगाच्या नावाचा विचार करतो. त्यानंतर, तो त्यासाठी लोगो डिझाईनचा विचार करायला सुरुवात करतो. तसेच या सर्व गोष्टी झाल्यानंतर आपण आपल्या उद्योगाच्या नावात बाबतीत किंवा लोगो बाबतीत एक विशिष्ट रंग संगती निवडण्याचा प्रयत्न करत असतो.

याचा सर्वस्वी विचार करून आपण आपल्या ब्रँडची एक आयडेंटिटी म्हणजेच, ओळख तयार करतो याच्याच माध्यमातून आपला ब्रँड हा आपल्या लक्ष ग्राहकांच्या मनात घर करीत असतो.

उदाहरणार्थ :आपण पॅरॅशूट या कंपनीचे उदाहरण घेऊ कित्येक वर्षापासून पॅरॅशूट या कंपनीचा ब्रँड कलर हा निळा आहे आपल्या लहानपणापासून आपण पॅरॅशूट बॉटल ही निळ्या रंगाची बघत आलेलो आहोत.

अचानक जर त्या बॉटलचा रंग निळ्या ऐवजी लाल करण्यात आला तर ? सुरुवातीला आपल्याला असे पटणार नाही, की हे पॅरॅशूट कंपनीची बॉटल आहे.

म्हणजेच रंगांच्या माध्यमातून का होईना पॅरॅशूट बद्दल त्याच्या ग्राहकांमध्ये निळा रंग म्हणजे पॅराशुट अशी ओळख निर्माण झाली आहे. ब्रँड आयडेंटिटी तयार करताना याच गोष्टींचा विचार केला जातो.

ह्याच गोष्टींचा अभ्यास ब्रँड आयडेंटिटी करताना ग्राफिक डिझायनर करीत असतो. आणि एक विशिष्ट टीम यात सहभागी असते. या विषयाला जोडूनच ब्रँड पर्सनॅलिटीचाही अभ्यास महत्त्वाचा असतो.

रंग, लोगो, नाव हे एकदाचे फिक्स झाल्यानंतर ब्रँड पर्सनॅलिटी म्हणजेच, ब्रँड कसा दिसेल याबद्दलही विचार केला जातो. विज्युअल आयडेंटिटी डिझायनर हा यात खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

कारण त्यांनी केलेले काम हे सर्व माध्यमांतून लक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा विचार त्याच्या डोक्यात त्याला ठेवावा लागतो. म्हणजेच प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया याचा विचार करून त्याला सर्व निर्मिती करणे गरजेचे असते.

या क्षेत्रात व्यवसाय करत असतांना काही Graphics Designer स्वतःचा ब्लॉग सुद्धा सुरु करतात, ब्लॉग कसा लिहावा? याबद्दल माहिती देत असतात.

अशाप्रकारे विज्युअल आयडेंटिटी डिझायनर चे काम सुरु असते. हे काम करीत असतांना तो ज्या प्रोडक्टवर काम करीत आहे, त्या प्रोडक्टचे कॉम्पिटीटर कोण आहेत त्याचा अभ्यास देखील त्याला करावा लागतो.

मार्केटिंग आणि ग्राफिक डिझायनर डिझाईनर | Marketing Graphics Designer 

ग्राफिक डिझायनर हा शब्द कानावर आल्यावर आपण मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायजिंग या गोष्टी मुख्यत्वेकरून आपल्या डोक्यात येतात.  उद्हेयोजक हे  त्यांच्या मार्केटिंग टीम वर अवलंबून असतात.

मार्केटिंग टीम ही ग्राहकांना सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करीत असते.याचा फायदा कंपनीला होतो. मात्र मार्केटिंग करण्यासाठी कंपनीला विशिष्ट गोष्टींची गरज असते उदाहरणार्थ पॅम्प्लेट पोस्टर होल्डिंग या सर्वांची गरज ही मार्केटिंग ग्राफिक डिझायनर पूर्ण करतो.

मार्केटिंग करताना संपूर्ण ग्राहकांच्या हिताचा विचार केला जातो. हा विचार करताना त्याच्या आवडीनिवडी, त्याच्या आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत, तो कोणत्या प्रदेशात राहतो, तिथले वातावरण कसे, याबद्दलही विचार केला जातो.

वरील सर्व अभ्यास डोळ्यासमोर ठेवून मार्केटिंग प्रमुख ग्राफिक डिझायनरच्या समोर ठेवतो, आणि त्यावर विचार करून ग्राफिक डिझायनर एक चित्र स्वरूपी माहिती तयार करतो.

मग ही माहिती  मार्केटिंग टीम आपल्या ग्राहकारांपर्यंत पोहोचण्यासाठी वापरते. आपण बघितले मार्केटिंग टीम आणि ग्राफिक डिझाईन हे मिळून या क्षेत्रात काम करीत असतात. मार्केटिंग टीम ही माहिती गोळा करते, आणि ग्राफिक डिझायनर त्या माहितीचे उत्कृष्ट डिझाईन तयार करून हे मार्केटिंग टीमला देत असतो.

जेणेकरून मार्केटिंग टीमचे काम सोपे होते, आणि ग्राहकाची निर्णय घेण्याची क्षमता वाढते. मार्केटिंग टीमद्वारे ग्राहकाला दिलेल्या पाम्प्लेत,पोस्टर हे तो निवांत वाचून निर्णय घेऊ शकतो.

अशा प्रकारच्या ग्राफिक डिझायनरला मार्केटिंग आणि ग्राफिक डिझायनर डिझाईनर असे म्हंटले जाते.

युजर इंटरफेस ग्राफिक डिझाईन | User Interface Design

(UI Design)

यूजर इंटरफेस डिझाईन म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. आपण इंटरनेट वापरतो, इंटरनेट वापरताना, आपण वेगवेगळ्या डिवाइस चा वापर करतो. यात मोबाईल, टॅब ,डेस्कटॉप, लॅपटॉप अशा वेगवेगळ्या स्क्रीनचा वापर आपण करीत असतो.

मुख्यत्वे करून आपण जेव्हा एखादे ॲप्लिकेशन वापरतो तेव्हा त्याला एक विशिष्ट रंग, विशिष्ट फॉन्ट, आणि त्याचे विशिष्ट लेआउट असते. जेणेकरून वापरकर्ता जो असेल त्याला वापरण्यास सोपे जावे.

युजर इंटरफेस ग्राफिक डिझाईन ही सर्व इलेक्ट्रॉनिक क्षेत्राशी संबंधित आहे. आपण जी सर्व इलेक्ट्रॉनिक साधने माहितीसाठी वापरतो तेव्हा त्यावर येणारी माहिती ही कशा स्वरूपाने समोरच्या व्यक्तीपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचेल

तसेच वेगवेगळ्या डिवाइस वर, वापरताना एखादे ॲप्लिकेशन कशा पद्धतीने काम करेल, म्हणजेच विशिष्ट प्रकारचे बटन, मेनू आणखीही अशा बऱ्याच गोष्टी याचा विचार युजर इंटरफेस ग्राफिक डिझाईन मध्ये केला जातो.

अशा प्रकारच्या ग्राफिक डिझाईनिंग मध्ये जर तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजेच HTML किंवा JAVA याचे ज्ञान असल्यास ते फायद्याचे ठरते. कारण याचाही अभ्यास युजर इंटरफेस डिझायनरला करणे गरजेचे असतेहे मार्केटिंग टीमला देत असतो.

आताच्या काळात युजर इंटरफेस ग्राफिक डिझाईन मध्ये काम करणाऱ्यांचा कल वाढलेला आहे. कारण आता सर्वांचा स्क्रीन टाइम  हा वाढलेला आहे. त्यामुळे इलेक्ट्रोनिक डिव्हाईस वापराकडे सर्वांचा कल वाढलेला आहे.

वेगवेगळ्या सोफ्टवेअर कंपन्यांमध्ये  युजर इंटरफेस ग्राफिक डिझाईनर ला खूप महत्व आलेले आहे. त्यामुळे खूप विद्यार्थी या क्षेत्राकडे आकर्षित होत आहेत.

पब्लिकेशन ग्राफिक डिझाईन | Publication Design 

Graphic Design आणि त्याच्याशी सम्बन्धित व्यवसाय आणि जॉब प्रोफाईल याबद्दल आपण माहिती घेत आहोत. आपण रोज वर्तमानपत्रे पुस्तके, Magazine, Directory, Annual Report, Catalogue वाचत असतो. या सर्व माध्यमे पब्लिकेशनचा म्हणजेच प्रकाशकांचा एक भाग असतात.

कोणतेही पुस्तक, वार्षिक अहवाल, वर्तमान पत्रे, याला विशिष्ठप्रकारचे लेआऊट असते, त्याची रचना करतांना  ग्राफिक डिझायनर ची गरज असते. म्हणजेच एखाद्या पुस्तकाचे मुखपृष्ठ किंवा त्या पुस्तकाचे नाव विशिष्ट कॅलिग्राफी किंवा टायपोग्राफी मध्ये केले जाते.

त्या पुस्तकासाठी विशिष्ट प्रकारे नियोजनबद्ध फॉन्ट वापरला जातो. तसेच विषयानुसार त्या पुस्तकांच्या आतल्या मजकुरामध्ये काही लेखाला अनुसरून चित्र टाकली जातात.

या सर्व गोष्टी करताना ग्राफिक डिझायनर महत्त्वाची भूमिका निभावत असतो त्यालाच पब्लिकेशन ग्राफिक डिझायनर असे म्हटले जाते.

आपण रोज वर्तमानपत्रे बघतो विशिष्ट प्रकारची रचना आपल्याला वर्तमानपत्रात बघायला मिळते या सर्व वर्तमानपत्राची सेटिंग हा ग्राफिक डिझायनर करीत असतो.

पॅकेजिंग ग्राफिक डिझायनर | Packaging Graphic Design

पॅकेजिंग ग्राफिक डिझायनर या शब्दातच अर्थ दडलेला आहे. आपण बाजारात जातो आपल्याला भरपूर प्रॉडक्ट्स दिसतात. ह्या प्रॉडक्ट्सवर लेबल्स असतात. हे लेबल्स ग्राहकाला त्या प्रॉडक्ट संबंधी संबंधी सर्व माहिती देत असतात.

याचाच अभ्यास पॅकेजिंग ग्राफिक डिझाईन मध्ये केला जातो. Packaging Graphic Design करताना ते प्रॉडक्ट कशा वातावरणात ठेवले जाणार आहे. कुठे विकले जाणार आहे. याचा विचार मार्केटिंग टीम द्वारे केला जातो.

आपण जे लेबल प्रॉडक्ट वरती पाहतो त्याचे डिझाईन हे पॅकेजिंग ग्राफिक डिझायनर करीत असतो. हे खूप आव्हानात्मक काम आहे. दुकानात ठेवलेल्या दहा प्रॉडक्टपैकी आपले प्रॉडक्ट हे उठून दिसायला हवे, यासाठी तशी डिझाईन त्या प्रॉडक्टच्या लेबलची किंवा पॅकेजिंगची असणे गरजेचे असते.

Packaging Design डिझाईन चांगली असली तर ग्राहक आपल्या प्रॉडक्टकडे आकर्षित होतो. आणि प्रॉडक्ट घेतो. म्हणून, अशा सर्व गोष्टींचा अभ्यास पॅकेजिंग ग्राफिक डिजाइनर करीत असतो. हे करीत असताना त्याला वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो.

उदाहरणार्थ : फोटोग्राफी, इलस्ट्रेशन, विज्युअल आयडेंटिटी या सर्व बाबतीत त्याला विचार करावा लागतो. हे खूप आव्हानात्मक काम आहे कारण. यात आपल्याला ग्राहकांच्या मानसिकतेचाही विचार करावा लागतो. आणि ग्राहकांच्या मानसिकते सोबतच इतर गोष्टींचाही विचार करावा लागतो.

आजच्या जगात ग्राहकाना आकर्षित करण्यासाठी कंपन्या आपल्या प्रोडक्टच्या Packaging Design बद्दल विशेष काळजी घ्यायला लगल्या आहेत.त्यामुळे या क्षेत्रातही खूप चांगल्या संधी आपल्याला आहेत.

मोशन ग्राफिक डिझायनर | Motion Graphics Design

शब्दातूनच आपल्याला याचे उत्तर मिळेल. आतापर्यंत आपण जे काही डिझाईन बघितले ते फक्त आणि फक्त चित्र स्वरूपात होते, त्याला गती नव्हती. पण, या प्रकारच्या ग्राफिक डिझायन मध्ये आपल्याला मोशन टाकावी लागते.

म्हणजेच गती टाकावी लागते हे एक प्रकारे Animation सारखेच काम आहे. मोशन ग्राफिक डिझायनर हा व्हिज्युअल क्रिएट करतोच पण त्याला आकर्षित करण्यासाठी तो विशिष्ट प्रकारचे ॲनिमेशन, ऑडिओ, टायपोग्राफी किंवा व्हिडिओ इफेक्ट्स त्यात ऍड करतो आणि यामुळे बघणाऱ्या व्यक्तीला ते जास्त आकर्षित वाटते.

मोशन ग्राफिक डिझायनर  हे मुख्यत्वेकरून टीव्ही आणि फिल्मची संबंधित किंवा एखाद्या प्रोडक्शन हाउस संबंधित क्षेत्रात काम करतात.

इन्व्हरमेंटल ग्राफिक डिझाईन | Environmental Graphic Design

इन्व्हरमेंटल ग्राफिक डिझाईन | Environmental Graphic Design अस  Environment म्हणजे वातावरण आणि या वातावरणाला समोरच्या व्यक्तीच्या गरजेनुसार, थीमनुसार सजविणे म्हणजेच एक विशिष्ठ जागा किंवा स्पेस समोरच्याच्या गरजेनुसार त्याला सजवून देणे हे इन्व्हरमेंटल ग्राफिक डिझाईन चे काम असते.

उदाहरणार्थ : आपण वेगवेळ्या कंपन्यांचे वेगवेगळे इव्हेंट बघतो, त्यात त्यांनी एक विशिष्ट प्रकारच्या स्टेजची रचना केलेली असते. ही रचना खूप आकर्षित करणारी असते. आपण Apple, Google , अशा प्रसिद्ध कंपन्यांचे इव्हेंट ऑनलाईन बघितले असतीलच, हे  हे असे इव्हेंट डिझाईन करतांना इन्व्हरमेंटल ग्राफिक डिझाईन  याचा विचार केला जातो

इन्व्हरमेंटल ग्राफिक डिझाईन हे क्षेत्रात काम करीत असतांना आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रांची माहिती असणे गरजेचे असते, यात काम करीत असतांना तुम्हाला आर्कीटेक, इंटेरिअर डिझायनर, इंडस्ट्रीअल या सर्व क्षेत्रांची महिती सोबत घेऊन चावे लागते.

एखाद्या इव्हेंट किंवा परिसर, विशिष्ठ जागा यांचा अनुभव हा अविस्मरणीय करणेच इन्व्हरमेंटल ग्राफिक डिझाईनरचे काम असते. मग यात एक्झिबिशन, ऑफिस इव्हेंट, एखाच्या दुकानाचे इंटेरिअर  हे सर्व प्रकार यात समाविष्ठ आहेत.

आर्ट आणि इलस्ट्रेशन  ग्राफिक डिझाईन | Art & Illustration Graphics Design 

ग्राफिक डिझाईन | Graphic Design या व्यवसायाचा अभ्यास करतांना आपण हे लक्ष्यात घेणे गरजचे आहे कि, ” Visual is more powerful than Word’s” म्हणजेच चित्र हे शब्दांपेक्षा जास्त प्रभावी असतात.

वरील सर्व प्रकारच्या Graphic Design मध्ये चित्र हे वापरलेच जाते. कारण कोणत्याही प्रकारची माहिती एखाद्या व्यक्तीला समजावून  सांगण्यासाठी शब्दापेक्षा चित्र हे खूप महत्वाची ठरतात.

तुम्ही एक पान भरून माहिती लिहिली आणि समोरच्या व्यक्तीने त्याच माहितीला घेऊन एक सुंदर म्हणजेच माहितीपूर्ण चित्र काढले तर, ते चित्र जास्त माहिती देणारे आणि लोकांना जस्त आकर्षित करणारे ठरते. म्हणून चित्रांची महती ही  शब्दांपेक्षा जास्त आहे.

उदाहरणार्थ : आपण एका सार्वजनिक बाथरूमच्या ठिकाणी गेल्यानंतर पुरुषांकरिता आणि स्त्रियांकरिता असे दोन फलक दिसतात, या फलकांवरून आपण समजून जातो. मात्र याच ठिकाणी शब्दात पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी असे लिहिले तर ?

सुशिक्षित माणसाला ते लगेच समजेल मात्र अशिक्षित माणसाला ते वाचता येणार नाही, मग अशा वेळेस चित्र उपयोगी पडतात.म्हणून चित्र हे संवाद साधण्याच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका निभावत असतात.

आर्ट आणि इलस्ट्रेशन  ग्राफिक डिझाईन मध्ये अशाच प्रकारचा आभ्यास केला जातो, आणि हा अभ्यास करतांना चित्र काढण्याची कला अवघत असणे गरजेचे असते.

आपण रस्त्यावरून जात असतो, आपल्याला मोठ मोठे होर्डिंग दिसतात, यावर मोठ मोठे फोटो किंवा चित्र असतात, रस्त्यावरून चालतांना आपण त्याकडे पाहून  चित्र कशाचे आहे. यावरून आपल्या लक्ष्यात येते कि, जाहिरात कशाची आहे, त्यानंतर आपण त्यावरची  माहिती वाचण्याचा प्रयत्न करतो.

ग्राफिक्स डिझाईन सॉफ्टवेअर  | Graphics Design Software 

ग्राफिक्स डिझाईन ला आजच्या काळात खूप महत्व आलेला आहे. ग्राफिक डिझाईन शिकत असतांना काही विशिष्ट सॉफ्टवेअर चे ज्ञान असणे खूप गरजेचे आहे. या सॉफ्टवेअर ची माहिती तुम्हाल असेल तर, तुम्ही या क्षेत्रात काम करू शकता.

मात्र या क्षेत्रात काम करतांना फक्त सॉफ्टवेअर चे ज्ञान असून चालत नाहीतर, आपल्याला  इतर विषयांचा अभ्यास करणे गरजेचे असते. आपल्या मनात हा विचार असेल कि, आता मी जे सॉफ्टवेअर ची नाव तुम्हाला सांगणार आहे, ते सर्व सॉफ्टवेअर शिकल्यावर आपण उत्तम डिझायनर होणार , मात्र असे नाही.

कोणतेही सॉफ्टवेअर हे एक टूल आहे आणि आपण त्यचा वापर हा टूल म्हणूनच केला पाहिजे. याच बरोबर आपल्याजवळ कल्पकता, एखाद्या गोशीकडे बघण्याचा कलात्मक दृष्टीकोन असायल हवा.

ग्राफिक्स डिझाईन सॉफ्टवेअर चा अभ्यस करतांना तुम्हाला Corel Draw, Adobe Photoshop, Adobe Indesign , Adobe Illustrator, Adobe Premier Pro, Adobe After Effects, यासर्व सॉफ्टवेअर ची माहिती असणे गरजेचे आहे.

वरील सर्व सॉफ्टवेअरचे  संपूर्ण ज्ञान असलेच पाहिजे असे नाही, मात्र तुम्हाला याबद्दल थोडी माहिती असणे गरजेचे आहे, मात्र यांपैकी क्न्त्याही 2 सॉफ्टवेअर वर तुमचे प्रभुत्व असणे  गरजेचे आहे.

फोटोशॉप हे खूप लोकप्रिय सॉफ्टवेअर आहे. वापरण्यास खूप सोपे आल्याकारणाने जस्तीत जास्त नवशिके यापासून सुरवात करतात.

यानंतर Illustrator हे सॉफ्टवेअर चा अनुभव सुद्धा photoshop सारखाच असल्याने हे सॉफ्टवेअर ही शिकायला आणि वापरासाठी खूप महत्वाचे आहे.

ग्राफिक्स डिझाईन ऑनलाईन प्ल्याटफॉर्म  | Online Platform For Graphics Design

तंत्रज्ञान खूप प्रगती करीत आहे . तामुळे आपल्याला त्याद्वारे मिळणाऱ्या सुविधाही खूप सोप्या आणि जलद काम होईल अशा  मिळत आहे. आपण आपल्या कॉम्पुटर मध्ये सॉफ्टवेअर इंस्टाल करून वापरतो.

मात्र आताच्या काळात काही अशा वेब साईट  आहेत जे आपले काम खूप सोपे करण्याचा  प्रयत्न करीत असतात. आपण जे काही काम सॉफ्टवेअर मध्ये करतो तसे काम आता आपल्याला ऑनलाईन प्ल्याटफॉर्म वर सुद्धा मिळत आहे.

या सर्व प्ल्याटफॉर्म  मध्ये CANVA या वेब साईट खूप महत्वाची आणि वप्र्न्याठी सोपी आहे. तसेच काही विशिष्ठ कामांसाठी ही वेबसाईट आपल्याला मोफत  आहे .

यात आपल्या आपल्या गरजेनुसार  काम करण्यासाठी वेग वेगळ्या सेक्शन ची निर्मिती केलेली आहे. त्यामुळे तआपल्याला तिचा वापर करण्यास कठीणता वाटत नाही.

ग्राफिक्स डिझाईन कोर्सेस  | Graphics Design Courses 

ग्राफिक्स डिझाईन कोर्सेस आपल्याला खूप ठिकाणी बघायल मिळणार आहेत, हे कोर्सेस शिक्विनार्यंची संख्या खूप आहे, मी वर सांगितली प्रमाणे सर्व व्चाकाना एकच सांगू इच्छितो कि,या क्षेत्रात काम करतांना फक्त सॉफ्टवेअर चे ज्ञान असून चालत नाहीतर,

आपल्याला  इतर विषयांचा अभ्यास करणे गरजेचे असते. आपल्या मनात हा विचार असेल कि, सर्व सॉफ्टवेअर शिकल्यावर आपण उत्तम डिझायनर होणार , मात्र असे नाही. आपल्याला आपल्यातला कलात्मक दृष्टीकोन वाढवायचा आहे,

ग्राफिक डिझायनर कसे बनावे? | How To Become A Graphic Designer? हे तुम्हाला बनायचे असेल तर सर्व वाचकांना ही  नम्र विनंती कि, आपण चित्रकलेशी संबंधीत कोर्स किंवा डिग्री घेऊन हा कोर्स केल्यास याचा तुम्हाला जास्त फायदा  होणार आहे. असे केल्यास तुम्ही फक्त ग्राफिक डिझायनर नाही तर , Successful ग्राफिक डिझायनर होणार आहात यासाठी तुम्ही खालील महाविद्यालयची महिती मिळवू शकता.

  1. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबाद गुजरात
  2. इंडस्ट्रियल डिझाईन सेंटर, आयआयटी बॉम्बे
  3. डिपार्टमेंट ऑफ डिझाईन, IIT गुवाहाटी
  4. सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, पुणे
  5. इंडियन स्कूल ऑफ इनोव्हेशन अँड डिझाईन, मुंबई
  6. निमेशन आर्ट्स अँड टेक्नॉलॉजी ॲकॅडमी, हैदराबाद
  7. दिल्ली कॉलेज ऑफ आर्ट्स, दिल्ली
  8. सर जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट, मुंबई
  9. इमेज इन्स्टिट्यूट ऑफ मल्टीमीडिया आर्ट्स अँड ग्राफिक इफेक्ट्स, तमिळनाडू
  10. नेशनल इंस्टिट्यूट ऑफ कंप्यूटर आर्ट्स, महाराष्ट्र.

प्रश्नोत्तरे | FAQ’s

प्रश्न १. ग्राफिक डिझाइनसाठी कोणती पदवी सर्वोत्तम आहे?

उत्तर :  वर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर Successful ग्राफिक डिझायनर आणि क्रियेटीव्ह ग्राफिक डिझाइनर होण्यसाठी तुम्ही चित्रकलेशी संबंधित पदवी घेतली पाहिजे जेणेकरू तुमचं कलात्मक दृष्टीकोन वाढेल.

प्रश्न 2. मी क्रिएटिव्ह डिझायनिंग का शिकले पाहिजे?

उत्तर : या क्षेत्रात आता खूप स्पर्धा वाढत आहे. आणि जेथे स्पर्धा वाढते तेथे तुम्ही तुमचे ज्ञान वाढविणे गरजेचे असते. जेणेकरून तुम्ही स्पर्धेमध्ये पुढे राहाल, वर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर Successful ग्राफिक डिझायनर आणि क्रियेटीव्ह ग्राफिक डिझाइनर होण्यसाठी तुम्ही चित्रकलेशी संबंधित पदवी घेतली पाहिजे जेणेकरू तुमचं कलात्मक दृष्टीकोन वाढेल.

प्रश्न 3.किती टक्के ग्राफिक डिझायनर फ्रीलान्स आहेत?

उत्तर : या क्षेत्रात आता खूप स्पर्धा वाढत आहे. आपण किती टक्के असा विचार केला टर असे सांगता येणार नाहीत, मात्र प्रत्येक ग्राफिक डिझायनर हा फ्रीलान्स काम करीत असतो. तो त्याचा जॉब करून उरलेल्या वेळेत हे काम करीत असतो.

प्रश्न ४.ग्राफिक डिझाइनचे 3 मुख्य उद्देश काय आहेत?

उत्तर : या क्षेत्राचे मुख्य उद्द्येश्य भरपूर आहे मात्र यापैकी ग्राहकांपर्यंत आपली माहिती पोहचविणे, त्यांना प्रोडक्ट किंवा सेवा विकत घेण्यसाठी प्रवृत्त करणे, जनजागृती करणे

प्रश्न ५.भारतात ग्राफिक डिझाईन हे चांगले करिअर आहे का?

उत्तर : या क्षेत्राचा विस्तार हा मोठ्या प्रमाणावर झालेला आहे, त्यामुळे बरेच डिझायनर हे भारतातच काय तर परदेशातील प्रोजेक्ट घरी बसून करीत असतात, त्यामुळे आपल्या काम करण्याच्या आणि Client Handling वरही हे अवलंबून राहते.

प्रश्न ६.ग्राफिक डिझाइन उद्योग स्पर्धात्मक आहे का?

उत्तर : या क्षेत्राचा विस्तार हा मोठ्या प्रमाणावर झालेला आहे, त्यामुळे येथे आता खूप स्पर्धा आहे, मात्र या स्पर्धेत आपण आपल्या विशिष्ट सवयी आणि काम करण्यची पद्धत, तसेच नवीन काही करण्याचा ध्यास. ही भावना ठेवल्यास या स्पर्धेत आपण अग्रेसर  राहतो.

तात्पर्य 

मित्रांनो आपण ग्राफिक डिझाईन या व्यवसायाबद्दल आणि कोर्स बद्दल माहिती पहिली, यात आपण ग्राफिक डिझाईन कसे शिकावे आणि त्याचे किती प्रकार पडतात आणि प्रत्येकाचे काम कसे वेगवेगळे आहे, तसेच हे क्षेत्र किती प्रगल्भ आहे, भारतातच नाही तर  भारताबाहेरही या क्षेत्रात किती संधी आहेत याचा अभ्यास आपण वरील लेखात केलेला आहे. ह लेख आपल्याला कसा वाटला याबल नक्की कमेंट करा आणि  आपण आम्हाला मेल करूनही कळवू शकता.

धन्यवाद.. ! जय महाराष्ट्र ..!

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button