महाराष्ट्र योजना

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना २०२३ | Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana 2023

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना २०२३ | Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana 2023

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना २०२३ | Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana 2023

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana 2023 | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2023 | Jan Arogya Yojana | Maharashtra Shasan Yojana | Mahatma Phule Yojana Online Registration |  महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना २०२३ मराठी  | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2023 Marathi

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना २०२३ | Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana 2023 | MJPJAY
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना २०२३ | Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana 2023

महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात यात , आरोग्य, शिक्षण, जलसिंचन, ग्रामोद्योग, शेती, व्यवसाय, उद्योग अशा निरनिराळ्या क्षेत्रात या योजना राबविल्या जातात. तसेच ह्या योजना समजतील अडचणी किंवा सामाजिक स्थिती, सक्षमीकरण, या बाबी लक्ष्यात घेऊन सुद्धा आखल्या जातात.सर्व नागरिकांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थिती बदल होऊन त्यांची प्रगती व्हावी हाच या मागचा उद्देश्य असतो.महाराष्ट्रातील नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जातांना मोठ्या अडचणी येतात. आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना यबद्दल अडचणी येऊ नये तसेच दवाखान्यासाठी आर्थिक आधार मिळावा हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन महाराष्ट्र शासनाने या योजनेची सुरवात केलेली आहे.

महाराष्ट्र शासनाकडून आपल्या नागरिकांना विविध योजना राबवल्या जातात. नागरिकांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, आरोग्य स्तर  वाढावा हा यामागचा हेतू असतो. निरनिराळ्या क्षेत्रात विविध योजना राबवल्या कारणाने नागरिकांना याचा फायदा होतो, आणि त्यांच्या  प्रगतीसाठी या योजना कारणीभूत ठरतात.

आपण कोरोनाच्या काळातून गेलो आहोत. आपण या प्रचंड भयावह परिस्थितीचा सामना केला आहे. सर्व महाराष्ट्रात आरोग्य व्यवस्था ही डगमगली होती. मात्र या परिस्थितीतून आपण सावरलो.

महाराष्ट्रातील नागरिक अशाच निरनिराळ्या आरोग्य  समस्यांना सामोरे जात आहे. या समस्यांना सामोरे जाताना दुर्बल गट करतील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते यात मुख्यत्वे करून दवाखान्यासाठी लागणारे आर्थिक बड कमी पडते आणि येथूनच अडचणी सुरू होतात याच अडचणी लक्षात घेऊन

अनुक्रमणिका

Table of Contents

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य  योजनेची सुरुवात

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना २०२३ | Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana 2023 योजनेची सुरुवात दिनांक 2 जुलै 2012 पासून सुरू केली. ही योजना सुरुवातीला राजीव गांधी जीवनदायी योजना म्हणून होती. दिनांक 2 जुलै 2018 ला सुरुवातीला आठ जिल्ह्यात ही योजना सुरू केली होती.

त्यानंतर आठ जिल्ह्यात प्रतिसाद चांगला मिळाल्यानंतर दिनांक 21 नोव्हेंबर 2013 पासून ही योजना महाराष्ट्रातील उर्वरित 28 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत लाभार्थींना निशुल्क वैद्यकीय सेवा पुरवण्यात येत आहे.

त्यानंतर भारत सरकारची आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना २०२३ | Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana 2023 योजना दिनांक 23 सप्टेंबर 2018 पासून एकत्रितरीत्या सुरू करण्यात आली.

सदर योजना दिनांक 2 7 2012 ते 31 3 2020 या कालावधीमध्ये नॅशनल इन्शुरन्स कंपनी या सार्वजनिक विमा कंपनी मार्फत राबवण्यात येत होती. दिनांक एक चार 2020 पासून एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी मार्फत राबविण्यात येणार आहे.

आज या लेखात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना २०२३ | Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana 2023 योजनेची संपूर्ण माहिती आणि या योजनेसाठी लागणारी पात्रता, अर्ज कसाकरावा, ऑनलाईन नोंदणी कशी करावी एकूण आजारांची यादी तसेच ही योजना राबवण्यासाठी शासनाने परवानगी दिलेल्या हॉस्पिटलची यादी आपण बघणार आहोत.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना २०२३ | Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana 2023 योजनेची वैशिष्ट्ये

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना २०२३ | Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana 2023 ही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 125 व्या पुण्यतिथीनिमित्त सुरू करण्यात आली होती. या अगोदर ही योजना राजीव गांधी जीवनदायी योजना या नावाने होती. सुरुवातीला महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू केल्यानंतर बाकी जिल्ह्यात या योजनेची सुरुवात झाली.

सुरुवातीला या योजनेत वैद्यकीय सेवा वैद्यकीय सेवेची रक्कम ही दीड लाखापेक्षा जास्त व्हावी तसेच यातील समाविष्ट रुग्णालयांची संख्या वाढवण्यात यावी जेणेकरून रुग्णांना त्यांच्या जवळच्या रुग्णालयात उपचार घेणे सोपे जाईल अशा विविध त्रुटींची पूर्तता करून नवीन स्वरूपात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2016 पासून राबविण्यात ची मान्यता मिळाली.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना २०२३ | Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana 2023 ही मुख्यत्वे करून आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनामार्फत सुरू करण्यात आली. या योजनेअगोदर शासनामार्फत जी जीवनदायी योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेत फक्त गंभीर आजारांचाच खर्च समाविष्ट करण्यात आला होता.

या योजनेत त्रुटी आढळल्या कारणाने महाराष्ट्र शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना दोन जुलै 2012 ला महाराष्ट्रातील मुंबई ठाणे, नांदेड धुळे अमरावती गडचिरोली सोलापूर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये सुरू करून यात 971 प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि थेरपी आणि इतर आरोग्य सेवांचा समावेश केला.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना २०२३ | Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana 2023 योजनेच्या यशानंतर महाराष्ट्र शासनाने सदर योजना महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये सुरू केली तसेच या योजनेचे नाव राजीव गांधी जीवनदायी योजना यावरून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना असे दिनांक 1 एप्रिल 2017 पासून करण्यात आले.

तसेच नागरिकांना या योजनेच्या अधिक माहितीसाठी आणि त्यांना या योजनेबद्दल माहिती मिळावी यासाठी 24 तास कॉल सेंटर ची स्थापना शासनामार्फत करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना या कॉल सेंटर वरून या योजनेची सर्व माहिती मिळायला सुरुवात झाली आणि नागरिकांच्या अडचणी कमी होऊ लागल्या.

कॉल सेंटरची स्थापना करताना तीन स्तरांवर विचार करण्यात आला योजनेची माहिती मिळवण्यासाठी तसेच उपचार सुरू असतानाची माहिती मिळवण्यासाठी आणि उपचार घेऊन घरी गेल्यानंतर. अशाप्रकारे तीन स्तरावर माहिती देण्यासाठी कॉल सेंटर सज्ज करण्यात आली.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अधिक पारदर्शकता आणि लोकप्रियतेमुळे राज्याच्या 2023 च्या अर्थसंकल्पानुसार या योजनेला अधिक बळकटी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आता पाच लाखांपर्यंतचे उपचार या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहेत. अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना २०२३ आरोग्य योजनेचे लाभार्थी

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना २०२३ | Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana 2023 योजनेचे लाभार्थ्यांसाठी  महाराष्ट्र शासनामार्फत एक तपशील सादर केला आहे. यात महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत वितरित करण्यात आलेले पिवळे शिधापत्र, अंत्योदय अन्न योजना, शिधापत्रिका, अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका व केशरी शिधापत्रिका धारकांचा आणि त्यांचे कुटुंब यांचा गट अ

औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, व वर्धा या अवर्षणग्रस्त 14 जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंब यांचा समावेश ब गटात

शासकीय अनाथ आश्रमातील मुले, शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, तसेच माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबातील सदस्य, तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील  जीवित बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे, यांचा गट क अशा तीन गटात समावेश करण्यात आला आहे.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना २०२३ योजनेचे शहरातील लाभार्थी

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना २०२३ | Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana 2023 शहरी भागातील 11 व्यावसायिक गटातील कामगारही या योजनेसाठी पात्र ठरविण्यात आले आहेत. शहरी भागातील कचरावेचक, भिक्षुक, घरगुती कामगार, गटई कामगार, मोची, फेरीवाले, रस्त्यावर सेवा पुरवणारे, अन्य कामगार, बांधकाम कामगार, प्लंबर, गवंडी, कामगार, रंगारी, वेल्डर, सुरक्षा रक्षक, हमाल व डोक्याने भार वाहणारे अन्य कामगार, सफाई कामगार, माळी, घरकाम करणारे, हस्तकला कारागीर, शिंपी, वाहतूक कर्मचारी, चालक, वाहक, त्यांचा मदतनीस, हातगाडी ओढणारे, सायकल रिक्षा ओढणारे, दुकानात काम करणारे, सहाय्यक, लहान आस्थापनांमधील शिपाई, मदतनीस, अटेंडर, वेटर, वीजतंत्री, मेकॅनिक, असेंबली, दुरुस्ती करणारे, धोबी, वॉचमन, यासर्व शहरी भागातील असंघटीत कामगारांचा यात समावेश करण्यात आलेला आहे.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना २०२३ योजनेचे ग्रामीण लाभार्थी

ग्रामीण भागातील एकूण सात वंचित निकषांपैकी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील ज्या वंचित घटकांचा यात समावेश करण्यात आलेला आहे, त्यातील कच्च्या भिंती आणि कच्च्या छताच्या एका खोलीत राहणारे कुटुंब, 18 ते 59 वयोगटातील प्रौढ पुरुष सदस्य नसलेले कुटुंब, दिव्यांग कुटुंब प्रमुख असलेले कुटुंब, अनुसूचित जाती जमाती मधील कुटुंब, भूमिहीन मजुरांची कुटुंबे, या ग्रामीण भागातील वंचितांचा  लाभार्थी म्हणून यात समावेश केलेला आहे.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना २०२३ योजनेचे विमा संरक्षण

विमा संरक्षण आणि विमा हप्ता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचा तपशील आणि लाभार्थ्यांची ओळख पटविण्यासाठी कागदपत्रे आपण वर पाहिली. या लाभार्थ्यांच्या दवाखान्याचा खर्च हा राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत नॅशनल इन्शुरन्स या कंपनीला अदा करण्यात येतो.

सदर विमा हप्ता हा चार टप्प्यात तीन-तीन महिन्यांच्या कालावधीनंतर जमा करण्यात येतो. या योजनेअंतर्गत लाभार्थी परिवारास दरवर्षी मिळण्यात दोन लाख रुपयांची विमा संरक्षणाची रक्कम वाढवून अडीच लाख करण्यात आलेले आहे. तसेच या योजनेचा लाभ कुटुंबातील एकाला किंवा सर्व सदस्यांना घेता येतो.

तसेच मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी खर्चमर्यादा ही  अडीच लाखांवरून साडेचार लाख इतकी वाढवण्यात आलेली आहे. यामध्ये दात्याच्या शस्त्रक्रियेचा समावेश असेल तसेच या योजनेअंतर्गत रुग्णाला उपचार सुरू होण्याआधी असलेल्या आजारांचाही समावेश असेल.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना २०२३ योजनेतील अंतर्भूत आजारांची यादी

  1. जळीत
  2. ह्दयरोग
  3. ह्दयरोग शस्त्रक्रिया व उपचार
  4. आकस्मिक सेवा
  5. त्वचारोग
  6. अंत:स्त्राव संस्थेचे विकार
  7. कान, नाक व घसा रोग
  8. सर्वसाधारण औषधशास्त्र चिकित्सा
  9. सर्वसाधारण शस्त्रक्रिया
  10. व्याधी चिकित्सा
  11. संर्सगजन्य आजार
  12. इंटरव्हेन्श्नल रेडिओलॉजी
  13. जठरांत्रमार्गाचे रोग
  14. कर्करोगावरील औषधोपचार
  15. नवजात व बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन
  16. मुत्रपिंड विकार
  17. मज्जातंतूचे विकार
  18. मज्जातंतूच्या विकारावरील शस्त्रक्रिया
  19. स्त्री रोग व प्रसुती शास्त्र
  20. नेत्ररोग शस्त्रक्रिया
  21. अस्थिव्यंग शस्त्रक्रिया
  22. बालरोग शस्त्रक्रिया
  23. बालरोग कर्करोग
  24. प्लास्टीक सर्जरी
  25. आस्कमिक वैद्यकीय उपचार
  26. कृत्रिम अवयव उपचार
  27. फुफ्फुसाच्या आजारावरील उपचार
  28. किरणोत्सर्गाव्दारे कर्करोग चिकित्सा
  29. संधिवात सबंधी उपचार
  30. जठर व आंत्र विकाराच्या शस्त्रक्रिया
  31. कर्करोगाच्या शस्त्रक्रिया
  32. मुत्रवह संस्थेच्या विकारांवरील शस्त्रक्रिया
  33. मानसिक आजार
  34. जबडा व चेहऱ्याच्या अस्थींवरील शस्त्रक्रिया

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना २०२३ | Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana 2023  ही योजना राबवण्यासाठी शासनाने परवानगी दिलेल्या हॉस्पिटलची यादी साठी येथे क्लिक करा .

रुग्णालयांची यादी

राखीव उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या 996 उपचारांपैकी 131 उपचार आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या 213 उपचारांपैकी एक 37 उपचार केवळ शासकीय रुग्णालयांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत अंगीकृत रुग्णालयाने तपासण्याच्या आधारावर रुग्णास दाखल करून घेऊन उपचारांसपूर्व परवानगी ची विनंती विमा कंपन्यास पाठवी लागते ही पूर्वपरवानगी 12 तासांमध्ये निश्चित केले जाते अत्यावश्यक परिस्थितीत संबंधित वैद्यकीय समन्वयकाने आपल्या आवाजाचे रेकॉर्डिंग सुविधा असलेल्या आपातकालीन दूरध्वनी सेवेद्वारे वैद्यकीय शल्यचिकित्सा पूर्वपरवानगीची मान्यता दिली जाते.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना २०२३ योजनेतील अंतर्भूत खर्च

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना २०२३ | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2023 या योजनेत समाविष्ट करण्यात येणारा खर्च महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या खर्चामध्ये सर्वसाधारण म्हणजेच जनरल वॉर्ड मधील घाटांचे शुल्क, परिचारिका शुल्क, विशेषज्ञ, भूलतज्ञ व वैद्यकीय अधिकारी यांचे शुल्क, तपासणी शुल्क, भूल,ऑक्सिजन, ऑपरेशन थिएटर, व अतिदक्षता शुल्क, शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याची किंमत, औषध व द्रव्य, कृत्रिम अवयवांची किंमत, रक्त संक्रमणाचे दर, (राज्य शासनाच्या धोरणानुसार) इन प्लॉट, एक्स-रे व निदान चाचण्या, आंतर रुग्णास भोजन, डिसपोजल व कन्सिलनेबल, राज्य परिवहनाच्या दरानुसार किंवा रेल्वेच्या द्वितीय श्रेणी भाडे यानुसार वाहतूक खर्च,(रुग्णालय ते रुग्णालयाचे निवासापर्यंत) या खर्चाचा समावेश आहे. या पॅकेज मध्ये रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यापासून तो घरी जाईपर्यंत सर्व अंतर्भाव असून हे सर्व सेवा रुग्णाला निशुल्क पुरवठायची आहे. तसेच जर उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला तर रुग्णाचा मृतदेह रुग्णालयातून घरापर्यंत घेऊन जाण्याचा खर्च हा पॅकेज मध्ये समाविष्ट आहे.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना २०२३ योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना २०२३ | Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana 2023 या योजनेच्या लाभार्थ्यांची वर्गवारी शहरी आणि ग्रामीण अशी केलेली आहे. आपण पाहिली शहरी भागात राहणारे मात्र आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचा यात समावेश करण्यात आलेला आहे, महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेल्या आरोग्य ओळखपत्र, असंघटित कामगार ओळखपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड, वाहन चालकाचा परवाना, यंचा साम्सावेश

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना २०२३ | Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana 2023 या योजनेत 14 जिल्ह्यांचा समावेश अवर्षणग्रस्त म्हणून केलेला आहे. त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सातबारा उतारा आणि पांढरी रेशन कार्ड याद्वारे उपचार मिळण्यासाठी सदर शेतकरी पात्र ठरविण्यात येतो. यासोबतच शासकीय आश्रम शाळेतील मुले, अनाथाश्रमातील मुले, महिला श्रमातील महिला, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, पत्रकार आणि त्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांना राज्य शासनाने निर्धारित केलेल्या ओळखपत्र आधारे ओळख पटवता येते.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना २०२३  योजना “आरोग्य मित्र”

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना २०२३ | Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana 2023  योजना महाराष्ट्र शासनाची अतिशय महत्त्वकांक्षी आणि प्रभावी योजना आहे. या योजनेचा प्रचार-प्रसार व्हावा तसेच सामान्यतल्या सामान्य नागरिकांना याचा फायदा घ्यावा घेता यावा यासाठी महाराष्ट्र शासन वेगवेगळ्या स्तरावर काम करीत आहे. आणि या योजनेच्या माहितीसाठी शासनाने 24 तास 155 388 1800 233 22 00 या टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे.

यासोबतच अंगीकृत रुग्णालयात लाभार्थी रुग्णांची नोंदणी तसेच उपचारादरम्यान त्यांना मार्गदर्शन तसेच या योजनेच्या अधिकाधिक वापर आपण कसा करू शकतो या सर्व माहितीसाठी आरोग्य मित्राची नियुक्ती केलेली असते. प्रत्येक अंगीकृत रुग्णालयांमध्ये या आरोग्य मित्राची नियुक्ती केलेली असते.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना २०२३ आरोग्य शिबीर

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना २०२३ | Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana 2023 आरोग्य योजनेच्या अंगीकृत रुग्णालयांच्या मार्फत आरोग्य शिबिर राबविण्यात येते. या शिबिरांच्या माध्यमातून रुग्णांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना काही आजार आढळून आल्यास त्या आजाराचे निदान व उपचार हे या योजनेच्या माध्यमातून केले जातात. अशा प्रकारे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना याचा फायदा होत आहे.

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button