महाराष्ट्रातील किल्ले आणि त्यांच्या पायऱ्या ? | Steps Of Forts in Maharashtra Vs Floors Of Building | महाराष्ट्रातील किल्ल्यांची माहिती
Steps Of Forts in Maharashtra Vs Floors Of Building

महाराष्ट्रातील किल्ले आणि त्यांच्या पायऱ्या ?
Steps Of Forts Vs Floors Of Building | महाराष्ट्रातील किल्ले सर करतांना तुम्ही प्रत्यक्षात किती मजले चढता ?
नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या योजना या पोर्टलवर नवीन माहिती घेणार आहोत. ही माहिती ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्वपूर्ण आणि प्रेरणादायी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी किल्ल्यांची बांधणी केली. स्वतः महाराज किल्ल्यांच्या बांधणीकडे लक्ष देऊन असत. प्रत्येक किल्ल्याचे एक वेगळे वैशिष्ट आहे, त्यांची विस्तृत माहिती आपण वेगवेगळ्या मध्यमातून वाचलीच असेल. सर्व माहिती वाचल्यावर आपल्यात या किल्यांच्या बाबतीत आणखी कुतूहल निर्माण होते. आपण किल्यांना भेटी दिल्यावर स्थापत्यकला पाहून आपण नतमस्तक जरूर होतो. महाराष्ट्रातील किल्ल्यांची नावे लिहा ? महाराष्ट्रातील किल्ल्यांची माहिती, महाराष्ट्रातील प्रसिध्द किल्ले यासर्व प्रश्नांच्या उत्तरात हा लेख नक्कीच भर घालणार आहे.
- महाराष्ट्रात किती प्रकारचे किल्ले आहेत?
- स्वराज्यात एकूण किती किल्ले आहेत?
- शिवरायांकडे कोण कोणते किल्ले होते?
- छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले किती आहेत?
वरील सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतीलच, पण आज आपण एका वेगळ्या विषयावर माहिती घेणार आहोत. मित्रांनो किल्यांच्या दर्शनसाठी गेल्यावर त्यांच्या पायऱ्या चढताना आपली काय परिस्थिती होते, हे आपल्याला माहितीच आहे. आज आपण उंच-उंच इमारतींमध्ये राहतो वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आपल्याला लिफ्टची सोय असते. एक दिवस लिफ्ट काही कारणास्तव बंद झाली तर, आपली दमछाक होते. वर जाणे आणि खाली येणे यात आपला दम भरून येतो. मात्र त्याकाळात महाराजांचे मावळे हे किल्ले दिवसातून किती वेळा चढ-उतर करत असतील असा प्रश्न डोक्यात येतो. आणि म्हणून आज आपण किल्यांच्या पायऱ्या चढताना प्रत्यक्षात आपण किती मजले चढतो याचा एक अंदाज आपण घेणार आहोत.
मुरुड–जंजिरा किल्ला :

मुरुड जंजिरा किल्याला एकूण १२५ पायऱ्या आहेत.आजच्या इमारतींच्या मजल्यांचा विचार केला तर, हा किल्ला चढल्यावर आपण एकूण ७ मजले चढतो.
साताऱ्याचा सज्जनगड

साताऱ्याचा सज्जनगडाला एकूण १८५ पायऱ्या आहेत, जे आजच्या इमारतींच्या मजल्यांचा विचार केला तर, साताऱ्याचा सज्जनगड चढल्यावर आपण एकूण १० मजले चढतो.
शिवनेरी किल्ला

शिवनेरी किल्ला चढतांना आपण एकूण ४०० पायऱ्या आपण चढून जातो. इमारतींच्या मजल्यांचा विचार केला तर, शिवनेरी किल्ला चढल्यावर आपण एकूण २२ मजले चढतो.
प्रतापगड किल्ला

प्रतापगड किल्ला चढतांना आपण एकूण ४५० पायऱ्या आपण चढून जातो. इमारतींच्या मजल्यांचा विचार केला तर, प्रतापगड चढल्यावर आपण एकूण २५ मजले चढतो.
रायगड किल्ला

रायगढ किल्ला चढतांना आपण एकूण १७३७ पायऱ्या आपण चढून जातो. इमारतींच्या मजल्यांचा विचार केला तर, रायगढ किल्ला चढल्यावर आपण एकूण ९६.५ मजले चढतो.
सिंहगड किल्ला

सिंहगड किल्ला चढतांना आपण एकूण २५०० पायऱ्या आपण चढून जातो. इमारतींच्या मजल्यांचा विचार केला तर, सिंहगड किल्ला चढल्यावर आपण एकूण १३९ मजले चढतो.
मित्रानो वरील सर्व माहिती आपल्याला आवडलीच असेल, तर ही माहिती आपल्या मित्र परिवार आणि आपल्या मुलांना नक्की सांगा आणि आपण कोणत्याही गडावर जातांना हे नक्की लक्ष्यात ठेवा की, हे किल्ल्ये स्वराज्याच्या रक्षणासाठी बांधले आहेत . यांचे संवर्धन करणे हे आपली जबाबदारी आहे.