महाराष्ट्र योजना

सुकन्या समृद्धी योजना २०२३  | Sukanya Samriddhi Yojana 2023

Table of Contents

Sukanya Samriddhi Yojana In Marathi | पीएम कन्या योजना | सरकारी योजना | Sukanya Samriddhi Yojana Online Form | सुकन्या समृद्धी योजना नोंदणी | सुकन्या समृद्धी योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी | सुकन्या समृद्धी योजना कॅल्कुलेटर | केंद्र सरकारी योजना

Sukanya Samriddhi Yojana 2023
सुकन्या समृद्धी योजना कॅल्कुलेटर | केंद्र सरकारी योजना

Sukanya Samriddhi Yojana 2023 केंद्र शासन आणि राज्य शासन देशातील नागरिकांना विविध सुविधा तसेच नागरिकांचे कल्याण, सर्वांगीण विकास, शिक्षण, आर्थिक विकास, व्हावा यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवित असते. देशातील नागरिकांना या सुविधांच्या माध्यमातून किंवा योजनांच्या माध्यमातून वेळोवेळी, विविध फायदे होत असतात.

यात नागरिकांच्या आरोग्याबाबत तसेच नागरिकांच्या मुलांचा चांगले शिक्षण, उच्च शिक्षण, आर्थिक मदत, तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत, हाच या सर्व योजनांचा हेतू असतो. अशीच एक योजना शासनाने मुलींसाठी राबवली आहे तिलाच सुकन्या समृद्धी योजना असे म्हटले जाते.

मुलींना उच्च शिक्षण मिळावे, त्यांना त्यांच्या पायावर उभे राहता यावे, स्वावलंबीपणे जीवन जगता यावे, तसेच त्यांचे भविष्य उज्वल व्हावे आणि सुरक्षित व्हावे यासाठी सुकन्या समृद्धी योजनेची निर्मिती झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून आयकर सूट, उच्च व्याजदर आणि मुलींचे भविष्य सुरक्षित करणे हा केंद्र शासनाचा उद्देश आहे. आणि हा उद्देश्य शासनाच्या माध्यमातून यशस्वीरीत्या पूर्ण होत आहे.


सुकन्या समृद्धी योजना 2023 सोप्या सरळ भाषेत

सुकन्या समृद्धी योजना माहिती | Sukanya Samriddhi Yojana

सुकन्या समृद्धी योजना ही योजना “बेटी बचाव बेटी पढाव” या अभियानाच्या अंतर्गत सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून मुलींचे पालक किंवा कायदेशीर संरक्षक मुलीच्या नावाने कोणत्याही बँकेत सुकन्या समृद्धी योजना खाते उघडू शकतात.

यातून बचत करून लाभार्थी मुलीच्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी किंवा तिच्या लग्नासाठी गुंतवणूक करू शकता. सुकन्या समृद्धी योजनेचे बचत खाते सुरू करण्यासाठी शासनाने मुलीची वयोमर्यादा ही १० वर्ष ठरवून दिलेली आहे. म्हणजेच दहा वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना नाही.

Sukanya Samriddhi Yojana 2023 बचत खाते आई वडील देशातील कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकांमध्ये उघडू शकतात. तसेच पोस्ट ऑफिस मध्येही उघडू शकतात. योजना सुरू झाल्यावेळी म्हणजेच सुरुवातीला या योजनेत १०००/- रुपयाची गुंतवणूक करणे आवश्यक होते. मात्र, आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या नागरिकांनीही या योजनेत सहभागी व्हावे.

Sukanya Samriddhi Yojana 2023 या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढावी, या दृष्टिकोनातून ही मर्यादा १०००/- वरून वार्षिक २५०/- रुपये प्रति वर्ष इतकी करण्यात आली, आणि यामुळे ही योजना अधिक लोकप्रिय आणि सक्रिय झाली. तळागाळातील किंवा आर्थिक परिस्थिती नसतानाही काही लोक या योजनेचा भाग झाले.आणि आपल्या मुलींचे भविष्य त्यांनी सुखकर केले.


सुकन्या समृद्धी योजना 2023 वैशिष्ट्ये

Sukanya Samriddhi Yojana 2023 अंतर्गत बचत खाते उघडण्यासाठी कमीत कमी गुंतवणूक मर्यादा २५०/- रुपये आणि जास्तीत जास्त गुंतवणूक मर्यादा ही १ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. नागरिकांच्या आवश्यकतेनुसार किंवा आर्थिक परिस्थितीनुसार नागरिक ही गुंतवणूक करू शकतात.

Sukanya Samriddhi Yojana 2023 या सरकरी योजनेतून मुलीचे उच्च शिक्षण आणि लग्नासाठी येणारा खर्च करता येतो. जेणेकरून भविष्यात लग्नामध्ये होणारा अमाप खर्च हा पालकांना जड जाणार नाही तसेच सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेच्या माध्यमातून सरकारद्वारे गुंतवणुकीवर 7.6% व्याजदर देण्यात येतो.

तसेच आयकरात सुद्धा सूट देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या आई-वडिलांनी सर्वप्रथम पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेमध्ये सुकन्या समृद्धी योजनेचे अकाउंट सुरू करण्याचा अर्ज करावा.सुकन्या समृद्धी योजना 2023 योजनेअंतर्गत मुलीच्या नावाने खाते उघडले त्या तारखेपासून या खात्याची वैधता ही २१ वर्षापर्यंत आहे.

त्यानंतर ज्या मुलीच्या नावाने पालकांनी बचत खाते सुरू केले आहे तिला योजना पूर्ण झाल्यावर ही धनराशी दिल्या जाईल.या योजनेच्या अंतर्गत दिलेल्या मुदतीनंतर म्हणजेच मुलगी २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर बचत खाते बंद होईल.

Sukanya Samriddhi Yojana 2023 बचत खात्यातील रक्कम ही तशीच राहू दिल्यास बँक किंवा पोस्ट ऑफिस यांच्या नियमाप्रमाणे वर्तमानातील व्याजदर जो असेल त्या व्याजदराप्रमाणे शिल्लक रकमेवर व्याज जमा होत राहील. S.S.Y म्हणजेच सुकन्या समृद्धी योजना 2023 अंतर्गत जर लाभार्थी मुलीचे वयाच्या २१ वर्ष पूर्ण होण्याआधीच लग्न झाले. तर, ही योजना आपोआप बंद होईल. मात्र या योजनेची बचत खात्याची वैधता 21 वर्ष जरी असली तरी या बचत खात्यात 14 वर्षांसाठी पैसे जमा केले जाऊ शकतात.


सुकन्या समृद्धी योजना 2022 योजनेचे तपशील आणि फायदे

Sukanya Samriddhi Yojana 2023 म्हणजेच सुकन्या समृद्धी योजना ही एक लघु बचत योजना आहे. या अंतर्गत खात्यावरील कमीत कमी आवश्यक निर्धारित केलेली रक्कम ही १०००/- रुपयांवरून २५०/- रुपये करण्यात आली आहे.

मुलीच्या पालकांनी ही रक्कम बचत खात्यामध्ये भरणे आवश्यक आहे. आणि ते नियमित असावे अन्यथा बचत खाते सक्रिय मांडले जाणार नाही. बचत खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी वार्षिक ५०/- रुपये दंड भरून हे खाते सुरू केले जाऊ शकते. या व्यतिरिक्त आपण निर्धारित केलेली रक्कम सुद्धा भरावी लागेल.

सुकन्या समृद्धी अंतर्गत खातेदारक मुलीच्या वयाची १८ वर्षे पूर्ण असेल तर बचत खात्यातील रक्कम काढू शकते मात्र अशा परिस्थितीत जमा असलेल्या रकमेपैकी ५०% रक्कमच ती काढू शकेल तसेच काढलेली ही रक्कम मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा तिच्या लग्नासाठी खर्च करणे आवश्यक आहे.

या योजनेअंतर्गत मुलगी १८वर्षे वयाची पूर्ण झाल्यावर रक्कम काढणे असल्यास हे निश्चित करणे अनिवार्य आहे की, बँकेच्या खात्यात किंवा पोस्टाच्या खात्यात १४ वर्षांची ठेव जमा असेल.


सुकन्या समृद्धी योजना : SSY अंतर्गत किती मुलींना योजनेचा लाभ मिळू शकतो, आता मुलीचे भविष्य करा सुरक्षित

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलींचे शिक्षण आणि लग्नाचा खर्च हा पालकांवर भार होऊ नये. म्हणून, सर्वतोपरी प्रयत्न शासनाने केलेला आहे. तसेच मुलींच्या भविष्याची काळजी ही शासनाने घेतलेली आहे. या योजनेअंतर्गत पालक किंवा कायदेशीर संरक्षक एका मुलीच्या नावाने एकच खाते उघडू शकतात.

दोन मुली असल्यास दोन मुलींच्या नावाने वेगवेगळे बचत खाते उघडू शकतात. काही परिस्थितीत म्हणजेच, एक मुलगी असताना दुसऱ्या वेळेस जुळ्या मुली झाल्या तर अशाच परिस्थितीत तिन्ही मुलींच्या नावाने पालक किंवा कायदेशीर संरक्षक गुंतवणूक करू शकतात. यासाठी दोन्ही मुली जुळ्या झाल्या आहेत याचा पुरावा सदर करावा लागणार आहे.


मुलींच्या शिक्षणासाठी सुकन्या समृद्धी योजना ठरते फायदेशीर

सुकन्या समृद्धी योजना ही “बेटी पढाव बेटी बचाव” यातून सुरू झाली आहे. बेटी पढाव बेटी  बचाव या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींचे शिक्षण आणि त्यांना स्वावलंबी करणे हे होते. मुलीच्या भविष्याचा विचार या योजनेतून करण्यात आला होता. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली.

गरीब व सर्वसाधारण परिवारातील मुलींना उच्च शिक्षण घेता यावे तसेच त्यांची शैक्षणिक प्रगती यातूनच महिला सक्षमीकरण, सशक्तिकरण तसेच भ्रूणहत्या थांबवावी, पालकांना मुलीच्या लग्नाच्या वेळेस पैशांची कमतरता भासू नये, हे उद्दिष्ट सुकन्या समृद्धी योजनेचे आहे. यापलीकडे शासनाकडून नागरिकांना ज्या योजना पुरवल्या जातात त्या योजनेत नागरिकांनी सहभाग घ्यावा.

जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही योजना पोहोचावी हे उद्दिष्ट आहे.मुलींच्या शिक्षणासाठी , मुलींच्या आरोग्यसाठी, मुलींचे लग्न व तिच्या उज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना एक लोकप्रिय योजना ठरत आहे. म्हणून सुकन्या समृद्धी योजना मुलींचे भविष्य अधिक सुरक्षित करणारी योजना आहे.


सुकन्या समृद्धी योजनेत झालेले बदल

आपल्याला माहितीच आहे, कोरोना काळामध्ये सर्व जगावर एक आर्थिक संकट आले होते. या आर्थिक संकटांवरला मात करताना, आर्थिक व्यवस्थेवरही याचा परिणाम झाला. हा आर्थिक परिणाम भयावह होता. कोरोना महामारीमुळे अख्खे जग थांबले होते.

संक्रमण थांबवण्यासाठी उद्योगधंदे किंवा सार्वजनिक ठिकाणी बंद ठेवण्यात आली होती. यामुळे आर्थिक घडामोडींवर याचा प्रचंड परिणाम झाला आणि या काळात सुकन्या समृद्धी योजनेवरही याचा परिणाम निश्चितच झाला. भारतीय रिझर्व बँकेने रेपो रेट कमी केला यामुळे शासनाच्या लहान व अल्प योजनांवर सुद्धा त्याचा परिणाम झाला.

सुकन्या समृद्धी योजना ही लघु बचत योजना असल्याकारणाने सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदरही कमी करण्यात आला. या योजनेवर सुरुवातीला 8.4% व्याजदर कमी करून 7.60% करण्यात आला या योजनेच्या सुरुवातीच्या काळात हाच व्याजदर 9.1% असा होता त्यापूर्वी तो 9.2% असा होता.मात्र तरीही सुकन्या समृद्धी योजना ही फायदेशीरच ठरत आहे.


सुकन्या समृद्धी योजना डिजिटल खाते

सुकन्या समृद्धी योजना ही भारतीय पोस्ट ऑफिस आणि अधिकृत बँकांच्या माध्यमातून सुरू केली गेली. केंद्र सरकारने ही योजना देशातील मुलींच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षणासाठी, मुली स्वावलंबी व्हाव्यात यासाठी आणि त्यानंतर विवाह संबंधीच्या खर्चासाठी, योजना सुरू केली आहे.

सुरुवातीच्या काळात योजने संबंधित व्यवहार करण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागत होते. मात्र पोस्ट ऑफिसमध्ये डिजिटल सेवा सुरू करण्यात आली, इतर बँकांच्या डिजिटल खात्यांप्रमाणेच पोस्ट ऑफिसचे खाते डिजिटल करण्यात आले. त्यामुळे सुकन्या समृद्धी योजनेचे हे खाते डिजिटल खाते झाले.

या खात्याच्या माध्यमातून किंवा या सेवेच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजना अधिक बळकट झाली. या बचत खात्यात रक्कम जमा करण्यासाठी नागरिकांना पोस्ट ऑफिस मध्ये जाण्याची आवश्यकता राहिली नाही. त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून ते कधीही यात पैसे ट्रान्सफर करू शकतात.तसेच इतर सुविधाही अनुभवू शकतात.


सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते बदलवण्याची प्रक्रिया

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते बदलवण्याची ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. यात जास्त अडचणी नाहीत. जर, काही कामानिमित्त किंवा पालकांची बदली झाल्यास, एका शहरातून दुसऱ्या शहरात कामानिमित्त शिफ्ट झाले. असल्यास, मुलीच्या नावावर असलेले, सुकन्या समृद्धी योजनेचे खाते तुम्ही, सहज नवीन ठिकाणी राहत असलेल्या भागात शिफ्ट करू शकता.

आपल्याला त्यासाठी आपण सर्वप्रथम ज्या ठिकाणी आपले सुकन्या समृद्धी योजनेचे खाते सुरू आहे, त्या बँकेत जाऊन अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठीचा एक विनंती फॉर्म बँक शाखेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये भरावा लागणार आहे. यात, आपल्याला ज्या बँकेत किंवा परिसरात आपले अकाउंट ट्रान्सफर करायचे आहे, त्या बँकेचा किंवा पोस्ट ऑफिस चा पत्ता अर्जामध्ये नमूद करण्याची आवश्यकता आहे, तसेच या अर्जासोबत आपल्याला खाते पासबुक सबमिट करावे लागेल.

यानंतर ज्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये आपले सुकन्या समृद्धी योजना ही खाते आहे, तुम्ही केलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून, चालू असलेले सुकन्या समृद्धी योजना खाते बंद कर करून ते खाते,आपल्या विनंतीनुसार ट्रान्सफर करताना, त्या खात्याची संबंधित असणारे सर्व कागदपत्रे खातेदाराला देईल. ही कागदपत्रे घेऊन आपण नवीन पोस्ट ऑफिस मध्ये जाणे आवश्यक आहे यानंतर नवीन पोस्ट ऑफिस किंवा बँकेला आपण ही कागदपत्रे नवीन अर्जासह सादर करणे आवश्यक आहे.

यात आपल्याला केवायसी डॉक्युमेंट फोटो आणि सहीचा नमुना सादर करणे आवश्यक असते. हे झाल्यानंतर नवीन बँक किंवा पोस्ट ऑफिस मधून तुम्हाला एक नवीन पासबुक दिल्या जाईल ज्यामध्ये तुमच्या बचत खात्याची जमा धनराशी दिसेल . अशा प्रकारे तुमचे सुकन्या समृद्धी योजना खाते ट्रान्सफर होईल आणि त्या खात्यामध्ये पुढे तुम्ही पैसे जमा करू शकाल.


सुकन्या समृद्धी योजना खाते पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया

सुकन्या समृद्धी योजना ही लघु बचत योजना आहे. हे खाती उघडण्यासाठी फक्त २५०/- रुपये लागतात. हे खाते सक्रिय ठेवण्यासाठी कमीत कमी २५०/- रुपये एवढी रक्कम दरवर्षी जमा करणे गरजेचे असते. योजनेच्या नियमानुसार ही रक्कम जमा केली नाही.

तर, ते खाते डिफॉल्ट समजल्या जाते अनेक वेळा सुकन्या समृद्धी योजनेचे खाते, पालकांच्या मार्फत उघडले जाते आणि काही कारणांमुळे किंवा आर्थिक परिस्थितीमुळे ते या खात्यात पैसे टाकण्यासाठी विसरतात. आणि सुकन्या समृद्धी योजनेचे खाते अशा अनेक कारणांमुळे डिफॉल्ट ठरते. पण मात्र हे खाते डिफॉल्ट झाले तरी म्हणजेच निष्क्रिय झाले तरी पुन्हा सक्रीय करणे आता सोपे आहे. यासाठी काही प्रक्रिया आहे त्या आपण समजून घेऊ

अशा परिस्थितीत सुकन्या समृद्धी योजना खाते तुम्हाला पुन्हा सक्रिय करण्यासाठी, खाते असलेल्या बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन एक फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे. यानंतर आपल्याकडे असलेली थकबाकी रक्कम भरून म्हणजेच तुम्ही दोन वर्ष किंवा तीन वर्ष रक्कम भरली नसेल तर या सर्व वर्षांची एकत्रित रक्कम भरून तसेच दरवर्षीप्रमाणे पन्नास रुपये दंड अशी एकत्रित रक्कम आपल्याला भरून हे खाते सक्रिय करता येऊ शकते.

उदाहरणार्थ आपण चार वर्ष पैसे भरले नाहीत अशा परिस्थितीत चार वर्षांचे २५/- रुपये प्रमाणे १००० रुपये आणि चार वर्षांचा ५०/-रुपयांप्रमाणे २००/-रुपये दंड म्हणजेच, एकूण बाराशे रुपये भरून आपले सुकन्या समृद्धी बचत खाते, आपण पुन्हा सक्रिय करू शकतात.


सुकन्या समृद्धी योजना आणि पोस्ट ऑफिस बचत खात्याचा विचार केला तर पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या व्याजाचा दर हा चार टक्के आहे तसेच सुकन्या समृद्धी योजना योजना खात्याचा दर 7.6% आहे.


सुकन्या समृद्धी योजनेवर कर्ज मिळते काय ?

सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या शिक्षणासाठी तसेच शिक्षण झाल्यानंतर तिच्या लग्नासाठी उपयोगी येईल, अशा दृष्टीने शासनाने सुकन्या समृद्धी योजना सुरू केलेली आहे. आणि म्हणून सुकन्या समृद्धी योजनेच्या बचत खात्यावर वर्तमान नियमानुसार कोणतेही कर्ज घेतले जाऊ शकत नाही.

सुकन्या समृद्धी खात्यात कर्ज घेण्याच्या उद्देशाने सुरक्षा ठेवली जाऊ शकत नाही. सुकन्या समृद्धी योजनेतील अटी आणि शर्तीनुसार बचत खात्यात असलेल्या गुंतवणुकीवर कर्ज मिळत नाही. मात्र मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूक करणाऱ्या मायबापांना नेहमी पैसे काढण्याचा पर्याय असतो. यात जमा झालेल्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम ही काढली जाऊ शकते, मात्र ही रक्कम मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा मुलीच्या लग्नासाठी वापरली जाऊ शकते.


सुकन्या समृद्धी योजना बँकांची यादी | Sukanya Samridhhi Yojana Bank List

  • ICICI Bankhttps
  • State Bank of India
  • IDBI Bank
  • Canara Bank
  • Indian Bank
  • Dena Bank
  • Vijaya Bank
  • Union Bank of India
  • Axis Bank
  • UCO Bank
  • Central Bank of India
  • Syndicate Bank
  • Allahabad Bank
  • Andhra Bank
  • Corporation Bank
  • Bank of Baroda
  • United Bank of India
  • Punjab National Bank
  • Bank of Maharashtra
  • Bank of India
  • Indian Overseas Bank
  • Punjab & Sind Bank
  • Oriental Bank of Commerce
  • State Bank of Travancore

सुकन्या समृद्धी योजना कॅल्कुलेटर | Sukanya Samridhhi Yojana Calculator



सुकन्या समृद्धी योजना आवश्यक कागदपत्रे

  • पालक किंवा कायदेशीर पालकांचा पत्ता पुरावा मुलीसाठी हे खाते उघडू इच्छिणाऱ्या पालकांना खाते उघडण्यासाठी वास्तव्याचा पुरावा सादर करणे गरजेचे असते तोच पुरावा आपण कोणत्याही ऍड्रेस प्रूफ च्या माध्यमातून देऊ शकतो यात उदाहरणार्थ पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन रेशन कार्ड विज बिल किंवा टेलिफोन बिल आणि आधार कार्ड यांचा समावेश होतो
  • ज्या पालकांना आपल्या मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू करावयाची आहे, किंवा बचत खाते उघडायचे आहे, त्यांनी बँकेसमोर खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते. सर्वप्रथम मुलीचे जन्म प्रमाणपत्र पालकांनी किंवा कायदेशीर पालकांनी संबंधित मुलीच्या जन्माचा पुरावा सादर करणे गरजेचे असते. हे प्रमाणपत्र तुम्हाला मुलीचा जन्म ज्या दवाखान्यात झाला आहे त्यांच्याकडून मिळू शकते.

सुकन्या समृद्धी योजनेच्या नियम व अटी खालील प्रमाणे

  • सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत किमान २५०/- रुपये देऊन बचत खाते उघडले जाऊ शकते म्हणजेच, कमीत कमी २५०/-रुपये दरवर्षीप्रमाणे या योजनेत गुंतवावे लागतील.
  • खातेधारकांनी २५०/-रुपये वार्षिक कमीत कमी गुंतवणूक केली नाही तर, अशा स्थितीत बचत खाते डिफॉल्ट होईल, आणि अशा प्रकरणात आपण किती वर्ष रक्कम भरली नाही ते वर्ष गुणीला २५०/- आणि वार्षिक प्रत्येक वर्षाचा पन्नास रुपये दंड अशी एकत्रित रक्कम भरून ते खाते पुन्हा सक्रिय केले जाऊ शकते.
  • सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यासाठी मुलीचे वय हे दहा वर्ष किंवा दहा वर्षाच्या आत असले पाहिजे.
  • या योजनेअंतर्गत दोन मुलीच योजनेचा लाभ घेऊ शकतात जर जुळ्या मुली किंवा तिहेरी मुलींचा जन्म असेल तर अशा वेळेस तिन्ही मुलींना च्या नावाने खाते उघडता येते.
  • सुकन्या समृद्धी बचत खाते मुलींच्या पालकाद्वारे तिच्या वयाच्या १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत चालवले जाते.
  • सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त एक लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते.
  • सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडल्याच्या तारखेपासून २१ वर्षापर्यंत किंवा मुलीच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर किंवा मुलीच्या लग्नाच्या वेळी मॅच्युअर होते.
  • सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर त्रैमासिक आधारावर सरकारद्वारे सुचित केले जातील. या योजनेअंतर्गत वर्तमानपत्रातील व्याजदर हे 7.6% आहे.
  • या योजनेअंतर्गत मुलीच्या बचत खात्याची देखरेख करणाऱ्या पालकाचा मृत्यू झाल्यास, अशा परिस्थितीत हे खाते बंद करता येऊ शकते.
  • खातेदाराचा मृत्यू झाल्यास किंवा खातेदाराला कोणतेही गंभीर आजार झाल्यास, अशा परिस्थितीत हे बचत खाते बंद केली जाऊ शकते.

सुकन्या समृद्धी योजनेबद्दल काही प्रश्नोत्तरे | FAQ’s

प्रश्न १. सुकन्या समृद्धी योजनेसाठी किती वर्षे भरावे लागतील? सुकन्या समृद्धी बचत खाते मुलींच्या पालकाद्वारे तिच्या वयाच्या १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत चालवले जाते.

प्रश्न २. सुकन्या योजना किती वर्षापर्यंत आहे? या योजनेत मुलीच्या वयाची अट ही १० वर्षे असून, १० वर्ष वय असणाऱ्या किंवा त्यापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलींना सुकन्या योजना लागू होते.

प्रश्न 3.सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत मुलीच्या जन्मापासून किती वर्षापर्यंत खाते उघडता येते? या योजनेत मुलीच्या वयाची अट ही १० वर्षे असून, १० वर्ष वय असणाऱ्या किंवा त्यापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलींना सुकन्या योजना लागू होते.

प्रश्न 4. सुकन्या समृद्धी योजनेत खातेदाराचा मृत्यू झाल्यास काय होईल? खातेदाराचा मृत्यू झाल्यास किंवा खातेदाराला कोणतेही गंभीर आजार झाल्यास,तसेच खातेदार ज्यांच्यावर अवलंबून आहे त्यांचा मृत्यू झाल्यास अशा परिस्थितीत हे बचत खाते बंद केली जाऊ शकते.

प्रश्न ५. सुकन्या समृद्धी योजनेचा फायदा काय? सुकन्या समृद्धी योजना ही लघु बचत योजना असल्याकारणाने सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदरही कमी करण्यात आला. या योजनेवर सुरुवातीला 8.4% व्याजदर कमी करून 7.60% करण्यात आला या योजनेच्या सुरुवातीच्या काळात हाच व्याजदर 9.1% असा होता त्यापूर्वी तो 9.2% असा होता.मात्र तरीही सुकन्या समृद्धी योजना ही फायदेशीरच ठरत आहे.

प्रश्न ६. मॅच्युरिटीनंतर पालक सुकन्या समृद्धी खात्यातून पैसे काढू शकतात का? सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडल्याच्या तारखेपासून २१ वर्षापर्यंत किंवा मुलीच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर किंवा मुलीच्या लग्नाच्या वेळी मॅच्युअर होते.

प्रश्न ७. सुकन्या समृद्धी खात्यात पैसे कोण जमा करू शकतात? सुकन्या समृद्धी बचत खाते मुलींच्या पालकाद्वारे तिच्या वयाच्या १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत चालवले जाते.

प्रश्न ८ . HDFC कडे SSY खाते आहे का? हो आहे, वर सर्व बँकांची लिस्ट दिलेली आहे.

प्रश्न ९ पोस्ट ऑफिसमधील सुकन्या समृद्धी खात्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? पालक किंवा कायदेशीर पालकांचा पत्ता पुरावा मुलीसाठी हे खाते उघडू इच्छिणाऱ्या पालकांना खाते उघडण्यासाठी वास्तव्याचा पुरावा सादर करणे गरजेचे असते तोच पुरावा आपण कोणत्याही ऍड्रेस प्रूफ च्या माध्यमातून देऊ शकतो यात उदाहरणार्थ पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन रेशन कार्ड विज बिल किंवा टेलिफोन बिल आणि आधार कार्ड यांचा समावेश होतो

ज्या पालकांना आपल्या मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू करावयाची आहे, किंवा बचत खाते उघडायचे आहे, त्यांनी बँकेसमोर खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते. सर्वप्रथम मुलीचे जन्म प्रमाणपत्र पालकांनी किंवा कायदेशीर पालकांनी संबंधित मुलीच्या जन्माचा पुरावा सादर करणे गरजेचे असते. हे प्रमाणपत्र तुम्हाला मुलीचा जन्म ज्या दवाखान्यात झाला आहे त्यांच्याकडून मिळू शकते.

प्रश्न १०. सुकन्या समृद्धी योजनेसाठी कोण पात्र आहे? या योजनेत मुलीच्या वयाची अट ही १० वर्षे असून, १० वर्ष वय असणाऱ्या किंवा त्यापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलींना सुकन्या योजना लागू होते.

प्रश्न ११ मुलींच्या शिक्षणाचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना राबवली आहे? मुलींच्या शिक्षणासाठी , मुलींच्या आरोग्यसाठी, मुलींचे लग्न व तिच्या उज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना एक लोकप्रिय योजना ठरत आहे. म्हणून सुकन्या समृद्धी योजना मुलींचे भविष्य अधिक सुरक्षित करणारी योजना आहे.

Advertisement

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button